मुंबई: बॉलिवूडची ‘दबंग गर्ल’ म्हणजे अभिनेत्री . ती सोशल मीडियावर कमालीची सक्रिय असते. वेगवेगळ्या माध्यमातून चाहत्यांशी ती संवाद साधत असते. नुकतंच तिनं तिच्या इन्स्टाग्रामवर ‘Ask Me Anything’ सेशन केलं. त्यावेळी काही नेटकऱ्यांनी सोनाक्षीला असभ्य प्रश्न विचारले. या प्रश्नांचे मजेशीर उत्तर देत तिनं त्या नेटकऱ्यांना चांगलंच सुनावलं आहे. एका युजरने असभ्यतेची सीमा ओलंडत तिला तिचे बिकिनीमधील फोटो शेअर करायला सांगितले. तर तिनं त्याची इच्छा पूर्ण करत नेटवरील बिकिनीच्या कपड्यांचा एक प्रातिनिधिक फोटो शेअर केला. सोनाक्षीनं आपला संयम न सोडता त्या प्रश्नाचं चोख उत्तर दिलं. सोनाक्षीच्या कामाबद्दल बोलायचं तर ती शेवटची सलमान खानच्या 'दबंग ३' या चित्रपटात दिसली होती. याशिवाय आपल्या आतापर्यंतच्या बॉलिवूड कारकिर्दित सोनाक्षीनं 'रावडी राठोड', 'सन ऑफ सरदार', 'लूटेरा', 'बॉस', 'हॉलीडे', 'तेवर', 'मिशन मंगल', 'खानदानी शफाखाना', 'आर.. राजकुमार' 'नूर' यांसारख्या चित्रपटांध्ये काम केलं आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/38lwU7R