नवी दिल्ली: करोनामुळे Work From Home कल्चर नंतर आता झूम मीटिंग खूप लोकप्रिय झाली आहे. कामाच्या वेळापत्रकामुळे, हे व्यासपीठ आता मोठ्या प्रमाणावर वापरले जात आहे. करोना काळात ऑफिसमध्ये जाऊन कर्मचाऱ्याला भेटणे खूप कठीण झाले होते. अशा स्थितीत त्या काळात फक्त झूम मीटिंग्सने युजर्सना खूप साथ दिली. पण, याचे अनेक अनेक तोटे देखील आहेत. पाहा टिप्स वाचा: मोठ-मोठ्या मुळे अनेकांना त्रासही सहन करावा लागतो . अनेक झूम कॉल्समुळे कर्मचाऱ्यांसाठी प्रोडक्टिव्हिटी कामात शिल्लक राहत नाही. यामुळे थकवा देखील येतो आणि त्यामुळे पुढील काम करता येत नाही. अशा परिस्थितीत, आज आम्ही तुमच्यासाठी अशा काही टिप्स घेऊन आलो आहोत, ज्यांच्या मदतीने झूम मिटींग्स दरम्यान कोणत्या गोष्टी कराव्या आणि कोणत्या नाही. याबद्धल तुम्हाला कल्पना येईल. मायक्रोफोनकडे विशेष लक्ष द्या: बोलत नसल्यास, आपण आपला मायक्रोफोन बंद करावा. कारण कधी-कधी त्यामुळे इतरांना त्रास होतो. दुसरीकडे, जर तुम्ही चुकून दुसऱ्या फोनवर बोलत असाल आणि मायक्रोफोन चालू असेल तर प्रत्येकजण तुमचे संभाषण ऐकू शकतो. तांत्रिक समस्यांदरम्यान घाबरू नका: कधी-कधी आपला व्हिडिओ खराब कनेक्शनमुळे फ्रीझ होऊ शकतो, आवाज जाऊ शकतो, कॉल ड्रॉप होऊ शकतो. अशात न घाबरता समस्या शोधा आणि आपली मिटिंग परत सुरू करा. गप्पांमध्ये काहीही बोलू नका: नेहमी लक्षात ठेवा की, झूम मिटिंग कॉल दरम्यान, चॅटमध्ये काहीही लिहू नका किंवा मीटिंगमध्ये तुम्ही जे सांगितले नाही ते करू नका. कारण तुम्हाला हे देखील माहित आहे की इंटरनेटच्या या युगात गप्पा खाजगी नाहीत. झूम कॉल आयोजित करणारी व्यक्ती चॅट्स सेव्ह आणि डाउनलोड करू शकते. कपडे व्यवस्थित घाला : तुम्ही आजपर्यंत असे अनेक झूम व्हिडिओ पाहिले असतील ज्यात लोक वर औपचारिक शर्ट परिधान करतात. परंतु, ते कोणत्याही कॅज्युअल प्रकारात बसतात. अशा परिस्थितीत अनेक वेळा तो काही कामासाठी उठतो आणि त्याचा कॅमेरा सुरूच असतो. अशा स्थितीत सर्वकाही लोकांसमोर येते. म्हणून, कधीही पूर्ण आणि व्यवस्थित कपडे घालून झूम बैठकीत सहभागी व्हा. कॅमेरा अँगल बरोबर ठेवा: कॅमेरा अँगल बरोबर ठेवणे खूप महत्वाचे आहे कारण बऱ्याच वेळा असे होते की, आपण कॅमेरा अँगल नीट ठेवत नाही आणि कॅमेरा मध्ये जो विषय आला पाहिजे त्यासह इतर अनेक गोष्टी येतात. त्यामुळे इतर कोणत्याही व्यक्तीला हे सर्व विचित्र वाटू शकते. म्हणून नेहमी कॅमेरा अँगल बरोबर ठेवणे आवश्यक आहे. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3lz8S1a