नवी दिल्ली : ने 32 इंच एचडी रेडी स्क्रीनसह नवीन लाँच केला आहे. या टीव्हीसोबतच सॅमसंग, रियलमी, एलजी आणि टीसीएलच्या स्मार्ट टीव्हींना टक्कर देणार आहे. नवीन टीव्ही पॅचवॉलसोबत अँड्राइड टीव्ही ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. यासोबतच, यात क्रोमकास्ट सपोर्ट देखील मिळेल. वाचाः Mi LED Smart TV ची किंमत आणि उपलब्धता नवीन एमआय स्मार्ट एलईडी ४सी ३२ इंच टीव्हीची किंमत १५,९९९ रुपयांपासून सुरू होते. पुढील काही दिवसात टीव्हीची किंमत वाढू देखील शकते. आजपासून टीव्ही विक्रीसाठी उपलब्ध असून, ग्राहक mi.com किंवा मधून टीव्ही खरेदी करू शकतात. फ्लिपकार्ट सेल आजपासून सुरू झाला आहे. Mi LED Smart TV 32-inch चे स्पेस्पिफिकेशन्स, फीचर्स LED Smart TV 4C 32 ची खास गोष्ट याचा ऑडिओ परफॉर्मेस असल्याचे सांगितले जाते. टीव्ही १० वॉट x २ पॉवरफुल स्टेरियो स्पीकरसह येतो. या टीव्हीवर तुम्ही चित्रपट, वेब सीरिज पाहण्याचा आनंद घेऊ शकता. ६४-बिट क्वाड-कोर प्रोसेसरसह येणाऱ्या या टीव्हीमध्ये १ जीबी रॅम आणि ८ जीबी स्टोरेज मिळते. यात अनेक पोर्ट, ब्लूटूथ आणि वाय-फाय सपोर्ट मिळेल. टीव्हीला टेबलटॉप अथवा कोणत्याही सपाट जागेवर ठेवू शकता. भिंतीवर लावण्यासाठी हँगिंग वेगळे खरेदी करावे लागेल. Mi TV साठी शाओमी नेहमीच कॉन्टेंट फर्स्ट एक्सपिरियन्स देण्याचा प्रयत्न करते. नवीन टीव्हीमध्ये दखील कंपनीने हाच प्रयत्न केला आहे. यामध्ये अॅमेझॉन प्राइम व्हिडीओ, नेटफ्लिक्स, डिज्नी+ हॉटस्टार, झी५, AltBalaji, SonyLIV, JioCinema सह SUNNXT, Kutuk, EPICON, HoiChoi सारख्या २५ पेक्षा अधिक अॅप्सचा अॅक्सेस मिळेल. सर्व महागड्या Mi TV मॉडेलप्रमाणेच यात देखील यूनिव्हर्सल सर्च, लाइव्ह टीव्ही आणि सर्च, किड्स मोड, स्मार्ट रिकमेंडेशन, यूजर सेंटर सारख्या सुविधा मिळतात. याशिवाय रिमोट कंट्रोलमध्ये गुगल असिस्टेंट, प्राइम व्हिडीओ, नेटफ्लिक्ससाठी खास बटनं देखील आहेत. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2VxrDXy