मुंबई- आयुष्य जगण्यासाठी माणसाच्या काही गरजा असतात आणि त्या पूर्ण करण्यासाठी पैसा हा लागतोच. आणि त्यासाठीच प्रत्येक व्यक्ती नोकरी, बिझनेस करत असतो. सर्व काही सुरळीत सुरू असताना काही कारणास्तव नोकरी गेली तर किंवा व्यवसाय ठप्प झाला तर? अशा वेळी संपूर्ण आयुष्याचं गणितच बिघडून जातं. माणसाची मानसिक स्थिती ढासळू लागते आणि पैसे कमावण्याच्या नादात, उतावळेपणात अनेकदा चुकीचा निर्णयही घेतला जातो. या एका चुकीच्या निर्णयातून आयुष्य कसे उद्ध्वस्त होऊ शकते, याची एक गोष्ट '' या वेब सीरिजमधून मांडण्यात येत आहे. प्लॅनेट मराठी या नव्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ही सीरिज पाहता येणार आहे. विशेष म्हणजे , यांसारखे तगडे अभिनेते यात प्रेक्षकांना दिसणार आहेत. निरंजन पत्की यांनी सीरिजचं दिग्दर्शक केलं आहे. नुकताच 'जॉबलेस'चा ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला असून महामारीच्या कठीण काळात सुव्रत 'जॉबलेस' का होतो.. पैसे मिळवण्यासाठी तो वाईट मार्गाचा अवलंब करतो का.. या अडचणीतून तो बाहेर येतो का... असे अनेक अनुत्तरित प्रश्न 'जॉबलेस'मधून उलगडणार आहेत. 'जॉबलेस' बद्दल 'प्लॅनेट मराठी ओटीटी'चे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात की, 'सद्यस्थितीवर आधारित ही वेबसीरिज आहे. करोनामुळे अनेक जणांच्या नोकऱ्या गेल्या. हा ज्वलंत विषय 'जॉबलेस' या सीरिजमधून मांडण्याचा प्रयत्न केला. नोकरी गेल्याने अनेक जण तणावपूर्ण जीवन जगत आहेत आणि त्यातूनच मग चुकीचे पाऊल उचलले जाते. एक चूक सावरताना हातून अनेक चुका होतात आणि संपूर्ण आयुष्य बदलून जाते. या कठीण परिस्थितीवर भाष्य करणारी ही सीरिज आहे. यातून प्रेक्षकांना नक्कीच काहीतरी बोध मिळेल. ३१ ऑगस्टपासून अतिशय अल्प दरात सीरिज पाहता येणार आहे.'
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2UcQ2S2