नवी दिल्ली : भारतीय बाजारात काही दिवसांपूर्वीच स्मार्टफोनला लाँच करण्यात आले होते. या फोनचा आज दुपारी १२ वाजल्यापासून पहिला सेल सुरू होणार आहे. फोनला ई-कॉमर्स वेबसाइट वरून खरेदी करू शकता. हा फोन २ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेज या एकाच व्हेरिएंटमध्ये येतो. सेल अंतर्गत ऑफर देखील मिळेल. इनफिनिक्सने रिलायन्स जिओसोबत भागीदारी केली आहे. स्मार्टफोनची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घेऊया. वाचाः Infinix Smart 5A ची किंमत आणि ऑफर्स फोनच्या २ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ६,४९९ रुपये आहे. फोनला मिडनाइट ब्लॅक, ओशियन वेव, क्यूटजल क्यान रंगात खरेदी करू शकता. इनफिनिक्सने या डिव्हाइसससाठी जिओसोबत भागीदारी केली असून, या अंतर्गत Jio Exclusive Device Lock Program लाँच करण्यात आला आहे. या अंतर्गत फोन खरेदी केल्यावर जिओ ५५० रुपयांचा कॅशबॅक देत आहे. सोबत १,१९९ रुपयांचे अतिरिक्त बेनिफिट्स देखील मिळतील. अन्य ऑफर्समध्ये बँकेच्या क्रेडिट/डेबिट कार्ड आणि आयसीआयसीआय बँकेच्या क्रिडेट कार्ड्सवर १० टक्के सूट मिळेल. फोनला २२६ रुपये प्रति महिना देऊन स्टँडर्ड ईएमआयवर खरेदी करू शकता. यावर ५,९५० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर मिळत आहे. एक्सचेंज ऑफरचा पूर्ण लाभ मिळाल्यास फोनला फक्त ५४९ रुपयात खरेदी करू शकता. Infinix Smart 5A चे फीचर्स: ड्यूल सिम सपोर्टसह येणारा हा फोन XOS ७.६ वर आधारित अँड्राइड ११ वर काम करतो. यामध्ये ६.५२ इंच एचडी+ डिस्प्ले देण्यात आला असून, याचे पिक्सल रिझॉल्यूशन ७२०x१५६० आहे. याचा आस्पेक्ट रेशियो १९.५:९ आहे. फोन क्वाड-कोर मीडियाटेक हीलियो ए२० प्रोसेसरसह येतो. यामध्ये २ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेज देण्यात आले आहे. स्टोरेजला मायक्रोएसडी कार्डने २५६ जीबीपर्यंत वाढवू शकता. यात रियरला ८ मेगापिक्सल आणि एआय कॅमेरा मिळेल. तर फ्रंटला ८ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो. पॉवरसाठी फोनमध्ये ५००० एमएएचची बॅटरी मिळते. यात डीटीएस सराउंड साउंड देण्यात आले आहे. कनेक्टिव्हिटीसाठी ४G LTE, Wi-Fi ८०२.११ a/b/g/n, ब्लूटूथ v५.०, जीपीएस/ ए-जीपीएस आणि मायक्रो-यूएसबी पोर्ट सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. यात रियर-माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर देखील मिळेल. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3lL3t7e