Full Width(True/False)

मुळ आहे अफगाणिस्तानात, लोकांनी समजलं पाकिस्तानी पण आहे भारतीय

मुंबई: बिग बॉस स्पर्धक मागच्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत आहे. अनेकदा तिला पाकिस्तानी असल्याचं म्हणत लोकांनी ट्रोल केलं आहे. पण आता या सर्वांना अर्शी खाननं सडेतोड उत्तर दिलं आहे. तिचं म्हणणं आहे की, ती भारतीय आहे आणि तिच्याकडे भारत सरकारकडून दिली जाणारी सर्व ओळखपत्र आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अर्शीनं स्वतःला कोणत्याही कारणाशिवाय ट्रोल केलं गेल्यानं अनेकदा नुकसान सोसावं लागलं असल्याचं सांगितलं. अनेकजण अर्शीला भारतात राहत असलेली पाकिस्तानी नागरिक समजत असल्याचं तिचं म्हणणं आहे. अर्शी खान म्हणाली, 'हा खूपच कठीण काळ आहे. लोक माझ्या नागरिकत्वावर विनाकारण प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत आणि ट्रोल करत आहेत. ते मला भारतात राहत असलेली पाकिस्तानी नागरिक असल्याचं समजतात. लोकांच्या या गोंधळामुळे अनेकदा माझ्या कामाचं नुकसान झालं आहे.' आर्शी खाननं तिला पाकिस्तानी समजून ट्रोल केलं गेल्याच्या दुःखद अनुभव सांगितला. ती म्हणाली, 'मी हे स्पष्ट करू इच्छिते की, मी भारतीय आहे. माझ्याकडे भारत सरकारकडून दिली जाणारी सर्व ओळखपत्र आहेत. मी पाकिस्तानी नाही तर तुमच्याप्रमाणेच एक भारतीय आहे.' अर्शी पुढे म्हणाली, 'मी एक अफगाणी पठाण आहे आणि माझं कुटुंब हे युसूफ जहीर पठाण जातीच्या समूहाशी संबंधित आहे. माझे आजोबा अफगाणिस्तानमधून निघून गेले होते आणि ते भोपाळमध्ये एक जेलर म्हणून कार्यरत होते. माझं मूळ अफगाणिस्तानातलं असलं तरीही मी एक भारतीय नागरिक आहे.' याआधी अर्शीनं अफगाणिस्तानमध्ये तालिबानचं राज्य येण्याबाबत चिंता व्यक्त केली होती. तिचं म्हणणं होतं की, 'मी अफगाणिस्तानच्या महिलांसाठी चिंतीत आहे. एक अफगाणी पठाण म्हणून मला या सर्व गोष्टींची फार भीती वाटत आहे. माझा जन्म तिथला आहे पण आज जर मी त्या ठिकाणी असते तर घाबरून माझा जीवच गेला असता. मी तिथल्या महिलांसाठी खूप दुःखी आहे. मी माझ्या तिथे असलेल्या मित्र-मैत्रीणींसोबत किंवा नातेवाईकांशीही संपर्क करू शकत नाहीए.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3y12diQ