Full Width(True/False)

'बेलबॉटम' थिएटरमध्ये तर ओटीटीवर प्रदर्शित होणार नव्या सीरिज

मुंबई : करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती हळूहळू सुधारत आहे. सिनेमांच्या, वेबसीरिजच्या चित्रीकरणांनाही सुरुवात झाली आहे. देशातील अनेक राज्यांत हळूहळू सारे व्यवहार अनलॉक होऊ लागले असून थिएटरही सुरू होऊ लागली आहेत. परंतु तरी देखील अद्याप सिनेमे थिएटरमध्ये प्रदर्शित करण्याचा धोका निर्माते घ्यायला तयार नाहीत. त्यामुळे अजूनही ओटीटीवरच अनेक सिनेमे प्रदर्शित होत आहेत. दर शुक्रवारी ओटीटीवर नवनवीन सिनेमे प्रदर्शित होत आहेत. तसेच काही मनोरंजक अशा वेबसीरिजही प्रदर्शित होत आहे. त्यामुळे आठवड्याअखेरीस तुम्हाला काही काही दर्जेदार वेबसीरिज बघायच्या असतील तर ही बातमी नक्की वाचा. अभिनेता अक्षय कुमारचा बहुप्रतिक्षीत असा 'बेलबॉटम' हा सिनेमा १९ ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये रिलीज झाला. करोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर रिलीज झालेला हा मोठा सिनेमा आहे. हिंदी सिनेमांमध्ये देशभक्तीपर सिनेमांना चांगला प्रतिसाद मिळतो. करोना काळात बेलबॉटम सिनेमाचं चित्रीकरण झालं. करोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर प्रदर्शित होणारा हा पहिला मोठा सिनेमा आहे. हा सिनेमा या काळात प्रदर्शित करून निर्माता जॅकी भगनानी यांच्यासह अनेक निर्मात्यांनी मोठी रिस्क घेतली आहे. यात अक्षय कुमारची मुख्य भूमिका आहे. सिनेमाचा ट्रेलर तर प्रेक्षकांना खूपच आवडला होता. आता मोठ्या पडद्यावर त्याला कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. या आठवड्यात शुक्रवारी म्हणजे २० ऑगस्ट रोजी झी ५ वर '२०० हल्ला हो' ही सिनेमा रिलीज होत आहे. हा सिनेमा सत्य घटनेवर आधारीत आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन सार्थक दास गुप्ताने केले असून यात बरुण सोबती, रिंकू राजगुरू, सलोनी बत्रा आणि साहिल खट्टर प्रमुख भूमिकेत आहेत. त्याशिवाय ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांचीही मुख्य भूमिका आहे. कार्टेल एमएक्स प्लेअर गोल्डवर कार्टेल ही वेबसीरिज २० ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. या सीरिजमध्ये सुप्रिया पाठक, तनुज विरवानी, जितेंद्रजोशी आणि रित्विक धनजानी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या सीरिजची कथा पाच क्राईम माफियांभोवती गुंफलेली आहे. लीग पार्ट १ कॉमेडी प्रीमिअर लीग पार्ट १ नेटफ्लिक्सवर २० ऑगस्ट रोजी रिलीज होणार आहे. या सीरिजमध्ये १६ कॉमेडी कलाकार चार टीममध्ये विभागले जाणार असून त्यांच्यात स्पर्धा होणार आहे. लवेबिल लंगूर्स, नाजूक नेवले, घरेलू गिलहरीज आणि आईडीजीएएफ इगुआनाज अशी चार टीमची नावे आहेत. नाईन पर्फेक्ट स्ट्रेंजर्स नाईन परफेक्ट स्ट्रेंजर्स ही मिनी सीरिज २० ऑगस्ट रोजी अॅमेझॉन प्राईमवर रिलीज होणार आहे. ही सीरिज २०१८ मध्ये या नावाने आलेल्या एका कादंबरीवर आधारीत आहे. या सीरिजमध्ये निकोल किडमॅन, मेलिसा मॅककार्थी, मॅनी जैसिंटो, ऐशर केडी, लूक एवांस मुख्य भूमिकेत दिसणार आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3syigTV