मुंबई- सिनेमात नायक म्हणून ओळख कमावण्यासाठी काय आवश्यक असतं असा प्रश्न जर तुम्हाला विचारला तर तुम्ही चांगलं दिसणं, सुदृढ शरीर, अभिनय आणि अशा इतर अनेक गोष्टी महत्त्वाच्या असतात असं सांगाल. पण बॉलिवूडमध्ये असेही काही कलाकार होऊन गेले ज्यांच्याकडे वरील सर्व गोष्टी होत्या, तरीही प्रेक्षकांनी त्यांना स्वीकारले नाही. सिनेसृष्टीत अनेक कलाकार होऊन गेले ज्यांच्यात नायक होण्याची क्षमता होती पण तरीही त्यांच्या सिनेमांना फारसे यश मिळाले नाही. असाच एक अभिनेता म्हणजे . साहिलने आपल्या पिळदार शरीरयष्ठीने प्रेक्षकांना आपल्या प्रेमात पाडलं होतं. वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत राहिला साहिल साहिल बॉलिवूडमध्ये कधीही यशस्वी नायक म्हणून ओळखला गेला नाही. साहिलने २००१ मध्ये 'स्टाईल' या सिनेमातून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्याच्यासोबत अभिनेता शर्मन जोशी या सिनेमात मुख्य भूमिकेत होता. सिनेमातील साहिल आणि शरमन यांची जोडी प्रेक्षकांना चांगलीच आवडली होती. एकीकडे, शर्मन जिथे बॉलिवूडचा हिट अभिनेता झाला, तिथे साहिल हळूहळू प्रेक्षकांच्या नजरेतून दूर होत गेला. साहिल खानने आपल्या संपूर्ण कारकिर्दीत एक्सक्यूज मी, ये है जिंदगी, डबल क्लास आणि अलादीनसह एकूण सात सिनेमांमध्ये काम केलं. पण कमकूवत कथानकांमुळे यातले अनेक सिनेमे फ्लॉपच ठरले. साहिलची कारकीर्द या सिनेमांमुळे संपुष्टात आली. पण सिनेमांपेक्षाही तो वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत राहिला. साहिल खानने २००४ मध्ये अभिनेत्री निगार खानशी लग्न केले पण त्यांचे लग्न फार काळ टिकले नाही. वर्षभरातच साहिल आणि निगार एकमेकांपासून विभक्त झाले. जॅकी श्रॉफ यांची पत्नी आएशा श्रॉफ यांनी त्याच्यावर समलिंगी असल्यामुळे पत्नीपासून घटस्फोट घेतल्याचा आरोप केला होता. आएशाचा आरोप होता की तिने साहिलसोबत, कर्मा प्रॉडक्शन आणि सायबर सिक्युरिटी फर्म असे दोन प्रॉडक्शन हाउस उघडली होती. या व्यवहारात साहिलने तिने गुंतवणुक केलेले सर्व पैसे हडप केले होते. आएशा यांनी साहिलवर ८ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप केला होता. आएशा म्हणाल्या होत्या कीसाहिलच्या पत्नीने त्याला एका पुरुषासोबत आक्षेपार्ह स्थितीत पाहिले होते, ज्यामुळे त्यांच्यात घटस्फोट झाला. या सर्व वादांनंतर साहिल बॉलिवूडपासून आणखी दूर गेला आणि त्याने स्वतःची जिम सुरू केली. त्याला व्यवसायात खूप फायदा झाला. साहिल एक फिटनेस उद्योजक आहे आणि त्याने त्याच्या जिमच्या अनेक शाखा उघडल्या आहेत. त्याचं एक यूट्यूब चॅनेलदेखील असून ज्याद्वारे तो लोकांना फिटनेसचा सल्ला देतो. याशिवाय साहिलचा मिनरल वॉटरचा व्यवसाय आहे. साहिल खानच्या मिनरल वॉटर ब्रँडचे नाव हंक वॉटर आहे. साहिल सिनेमांपासून दूर राहूनही कोट्यवधींची कमाई करतो.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3svEg1K