Full Width(True/False)

'मराठीत मी मुस्लिम भूमिका साकारत असेन तर हिंदीत का नाही'

मुंबई- अभिनेता यांनी गेली अनेक वर्ष मराठी चित्रपटसृष्टी गाजवली. सचिन यांची प्रत्येक भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. प्रत्येक भूमिकेला न्याय देण्याची कला असलेल्या या हरहुन्नरी कलाकाराने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत एक खंत व्यक्त केली. सध्या '' सर्वत्र गाजते आहे. वेबसीरिजमधील सचिन यांच्या भूमिकेचं देखील प्रेक्षकांकडून कौतुक करण्यात आलं. परंतु, ओटीटी प्लॅटफॉर्मवर मराठी कलाकारांना फक्त मराठी भूमिकांसाठीच विचारणा केली जात असल्याचं वक्तव्य सचिन यांनी मुलाखतीत केलंय. एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत सचिन म्हणाले, 'मला अनेक ऑफर्स आल्या पण मी त्यांना नकार दिला. मला एकाच प्रकारच्या भूमिका करायच्या नाहीत. खलनायकाच्या भूमिका साकारायला काहीच अडचण नाही पण त्याच त्याच भूमिका मला करायच्या नाहीत. लोकांचं जर असं म्हणणं असेल की मी फक्त मराठी अभिनेता आहे तर ते चूक आहे. मी मराठीपेक्षा जास्त काम हिंदीमध्ये केलं आहे. यात जर तुम्ही एखाद्याला टाइपकास्ट करत असाल तर ते गैर आहे. मी जर मराठी चित्रपटामध्ये मुस्लिम भूमिका साकारत असेन तर मग हिंदीत का नाही? मराठी चित्रपटांपासून मी सुरुवात केली ती माझी मातृभाषा आहे. मला तिचा अभिमान आहे. पण भारतातील इतर ठिकाणी लोक मला फक्त सचिन म्हणून ओळखतात.' ओटीटीवर हिंदी वेबसीरिजमधील फक्त मराठी भूमिकांसाठी विचार केला जात असल्याचं सांगत सचिन म्हणाले, 'कधीकधी प्रश्न पडतो की महाराष्ट्रीयन भूमिका साकारायची असते तेव्हाच मराठी लोकांचा विचार का केला जातो? हे फक्त मी माझ्या बाबतीत बोलत नाहीये. एखाद्या वेगळ्या भूमिकेसाठी मराठी कलाकाराचा विचार का केला जात नाही? कलाकार हा कलाकार असतो. मराठीत असा विचार केला जात नाही. फक्त मराठी व्यक्तिरेखांसाठी मराठी कलाकार हवेत असा विचार ओटीटी प्लॅटफॉर्मवरील निर्मात्यांनी करू नये. मला आणखीही काम करायचं आहे फक्त त्या भूमिकांमध्ये वेगळेपण असणं गरजेचं आहे.'


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2VGc54v