Full Width(True/False)

प्रतीक्षा संपली ! बजेट स्मार्टफोन Realme C21 Y चा पहिला सेल आज, पाहा किंमत ऑफर्स

नवी दिल्ली : स्मार्टफोन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवरून आज दुपारी १२ पासून ग्राहकांना खरेदी करता येईल. फोनमध्ये ५००० mAh ची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. तसेच, फोनच्या मागील पॅनलवर ट्रिपल AI कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनला रिव्हर्स चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. फोनला सुपर पॉवर सेव्हिंग मोडचा देखील सपोर्ट आहे. तसेच फोनमध्ये ५ एमपीचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. Realme C21Y स्मार्टफोन दोन उत्तम रंग पर्याय क्रॉस ब्लू आणि क्रॉस ब्लॅक मध्ये खरेदी करता येईल. वाचा: Realme C21Y : किंमत Realme C21Y च्या ३GB रॅम आणि ३२ GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ८,९९९ रुपये आहे. तर फोनचा ४ GB रॅम आणि ६४ GB स्टोरेज प्रकार ९,९९९ रुपयांमध्ये येईल. कोटक महिंद्रा बँक, येस बँक, अॅक्सिस बँकेच्या क्रेडिट कार्डासह फोन खरेदीवर ५ टक्के सूट असेल. तर BOB, ICICI बँकेच्या मास्टरकार्डवर १० % सूट मिळेल. त्याच वेळी, सीआयसीआय बँकेच्या मास्टर डेबिट कार्डसह खरेदीवर ५० रुपयांची ऑफर उपलब्ध आहे. Realme C21Y स्मार्टफोन AI ट्रिपल कॅमेरा सेटअप आणि सुपर नाइटस्केप मोडसह येईल. फोनमध्ये ६.५ इंचाचा HD+ मिनी ड्रॉप फुल स्क्रीन डिस्प्ले देण्यात आला आहे. स्क्रीन टू बॉडी रेशियो ८९.५ % असेल. फोन १२ nm ऑक्टा-कोर Unisoc T610 प्रोसेसर सपोर्टसह येईल. त्याची घड्याळाची गती १.८ GHz असेल. हा फोन Android ११ आधारित Realme UI वर काम करेल. फोनमध्ये ५००० mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. Realme C21Y स्मार्टफोनमध्ये १३ MP चा प्राथमिक कॅमेरा आहे, जो ४X आणि PDAF ऑटोफोकसला सपोर्ट करतो करतो. Realme C21Y स्मार्टफोनमध्ये अल्ट्रा फास्ट फिंगरप्रिंट अनलॉक सपोर्ट देण्यात आला असून फोन चेहऱ्यावरील ओळख समर्थनासह येईल. Realme C21Y स्मार्टफोनमध्ये ड्युअल सिम स्लॉट देण्यात आला आहे. तसेच एक समर्पित SD कार्ड स्लॉट देखील यात देण्यात आला आहे. यामुळे फोनमध्ये २५६ GB अतिरिक्त जागा उपलब्ध होईल. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2V1KTNc