नवी दिल्ली : Tesla चे सीईओ आणि चे संस्थापक यांच्यामध्ये स्पर्धा पाहिला मिळत आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले दोघेही स्पेस एक्सप्लोरेशन वेंचर आणि साठी एकामेकांशी स्पर्धा करत आहे. यांनी याआधी देखील जेफ बेझॉस यांची खिल्ली उडवली आहे. आता पुन्हा एकदा ट्विटच्या माध्यमातून टोला लगावला आहे. हायड्रोजन कार्सबाबत करण्यात आलेल्या एका ट्विटला उत्तर देताना मस्क म्हणाले की, कितीही पैसा भौतिक विज्ञानाची अहवेलना करू शकत नाही. एवढ्यावरच न थांबता आणखी एक ट्विट करत ते म्हणाले की, जेफ बेझॉस खूपच प्रदर्शन करत आहे. वाचाः गेल्या काही दिवसांपासून मस्क कोणत्याना कोणत्या मुद्यावरून बेझॉस यांच्यावर निशाणा साधत आहे. याआधी देखील एका खटल्यावरून ट्विट करत मस्क यांनी त्यांना Irony(y) Man म्हटले होते. एलॉन मस्क यांच्या स्पेसएक्सला चंद्रावरील मोहिमेसाठी लँडरचे २.९ बिलियन डॉलर्सचे कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले होते. यावरून बेझॉस यांच्या ब्लू ओरिजिनने निशाणा साधला होता. यामध्ये या मिशनमधील काही त्रुटींबाबत माहिती दिली होती. Blue Origin ने आपल्या वेबसाइटवर इन्फोग्राफिक प्रकाशित करत मस्क यांच्या स्टारशिपबाबत माहिती दिली होती. यात म्हटले होते की, नासाच्या अंतराळवीरांना चंद्रावर नेण्यासाठी स्टारशिपचा उपयोग करणे धोक्याचे ठरू शकते. मात्र, दुसरीकडे बेझॉस सार्वजनिकरित्या मास्क यांच्याबाबत काहीही बोलत नसले तरी मस्क मात्र ब्लू ओरिजिनबाबत अनेकदा बोलताना पाहायला मिळाले आहेत. मस्क ट्विटरच्या माध्यमातून अशाप्रकारची टिप्पणी अनेकदा करत असतात. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3AFigo6