नवी दिल्ली: जर तुम्हाला हॅकर्सना तुमच्या अकाउंटपासून दूर ठेवायचे असेल तर वेळोवेळी बदलला पाहिजे आणि पासवर्ड सुद्धा असा असावा की सहज क्रॅक होणार नाही . आपल्यापैकी बहुतेक जण दररोज ईमेल पाठवण्यासाठी चा वापर करतातच. पण, कधी-कधी युजर्स सोशल मीडिया अॅप्स, बँकिंग अॅप्स, ई-वॉलेट अॅप्स इत्यादींसाठी सेट केलेले पासवर्ड विसरून जातात. वाचा: जर तुमचा पासवर्ड इतरांना माहित झाला असेल किंवा तुम्ही तुमचा पासवर्ड सुरक्षिततेच्या दृष्टीने बदलण्याचा विचार करत असाल, तर आम्ही तुम्हाला काही सोप्या स्टेप्स सांगू ज्या तुम्ही अँड्रॉइड किंवा आयओएस वर वाप रू शकता. Android स्मार्टफोनमध्ये Gmail पासवर्ड कसा बदलायचा ?
- सर्वप्रथम तुमच्या फोनच्या सेटिंग्जवर जाऊन तुम्हाला गुगल पर्यायावर टॅप करावे लागेल.
- गुगलवर टॅप केल्यानंतर, तुम्हाला तुमचे Google खाते व्यवस्थापित करा वर क्लिक करावे लागेल.
- स्क्रीनच्या शीर्षस्थानी सुरक्षा पर्याय निवडा. यानंतर Google मध्ये साइन इन करण्याच्या पर्यायावर पासवर्ड वर टॅप करा.
- यानंतर, तुम्हाला तुमच्या खात्यात साइन इन करावे लागेल किंवा तुम्ही खाली दाखवलेल्या Forgot Password वर क्लिक करून नवीन पासवर्ड तयार करू शकता.
- यासाठी सर्वप्रथम जीमेल अॅप उघडा किंवा जर तुमच्या फोनमध्ये अॅप आधीपासून नसेल, तर तुम्ही अॅपल अॅप स्टोअर वरूनही अॅप डाउनलोड करू शकता.
- स्क्रीनच्या वरच्या उजव्या बाजूला तुम्हाला तुमचे प्रोफाइल चित्र किंवा तुमच्या नावाचे आद्याक्षर दिसेल, त्यावर टॅप करा.
- Google Account वर क्लिक करा, तुमचे Google खाते व्यवस्थापित करा तुमच्या समोर दिसेल.
- यानंतर तुम्हाला पर्सनल इन्फो वर टॅप करावे लागेल जे स्क्रीनच्या वरच्या उजव्या बाजूस दिसते.
- यानंतर तुम्हाला बेसिक इन्फो सेक्शन मधील पासवर्ड पर्यायावर क्लिक करावे लागेल, त्यानंतर तुम्हाला सध्याचा पासवर्ड टाकून साइन इन करावे लागेल.
- त्यानंतर नवीन पासवर्ड दोनदा एंटर करा आणि नंतर पासवर्ड बदला.
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3gg91my