नवी दिल्ली : ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एकापेक्षा एक शानदार प्लान्स आहेत. या प्लान्समध्ये डेटा, मोफत कॉलिंग, एसएमएस आणि इतर बेनिफिट्स मिळतात. काही प्लान्समध्ये , आणि Disney+ Hotstar चे देखील मोफत सबस्क्रिप्शन मिळते. तुम्हाला देखील या प्लॅटफॉर्म्सचा मोफत लाभ घ्यायचा असल्यास रिलायन्स जिओचे पोस्टपेड प्लस प्लान घेऊ शकता. या प्लान्सची किंमत ३९९ रुपयांपासून सुरू होते. Netflix, Amazon Prime आणि Disney+ Hotstar चे मोफत सबस्क्रिप्शन मिळणाऱ्या जिओच्या या प्लान्सविषयी जाणून घेऊया. वाचा: Reliance Jio ३९९ रुपयांचा प्लान Netflix, Amazon Prime आणि Disney+ Hotstar मोफत सबस्क्रिप्शनसह येणारा हा सर्वात स्वस्त पोस्टपेड प्लस प्लान आहे. यामध्ये यूजर्सला एकूण ७५ जीबी डेटा मिळतो. डेटा समाप्त झाल्यानंतर यूजर्सला प्रती जीबीसाठी १० रुपये द्यावे लागतील. याशिवाय यात अनलिमिटेड कॉलिंग, दररोज १०० एसएमएस मिळतात. यात Amazon Prime Video चे १ वर्षाचे सबस्क्रिप्शन मिळते. Reliance Jio PostPaid Plus ५९९ रुपयांचा प्लान हा प्लान देखील ओटीटी सबस्क्रिप्शनसह येतो. यामध्ये एकूण १०० जीबी डेटा मिळतो. यानतंर २०० जीबीपर्यंत डेटासाठी प्रती जीबी १० रुपये लागतील. Reliance Jio PostPaid Plus ७९९ रुपयांचा प्लान या प्लानमध्ये यूजर्सला १५० जीबी डेटा मिळोत. हा फॅमिली प्लान दोन पोस्टपेड कनेक्शनसोबत शेअर करू शकता. यात देखील ओटीटी सबस्क्रिप्शन आणि इतर बेनिफिट्स वरील प्लान प्रमाणेच आहेत. Reliance Jio PostPaid Plus ९९९ रुपयांचा प्लान या प्लानमध्ये यूजर्सला २०० जीबी डेटा मिळतो. यानंतर ५०० जीबीपर्यंत प्रती जीबीसाठी १० रुपये लागतील. इतर बेनिफिट्स समानच आहेत. Reliance Jio PostPaid Plus १४९९ रुपयांचा प्लान या प्लानमध्ये ३०० जीबी डेटा मिळत नाही. यामध्ये अतिरिक्त फॅमिली मेंबरला देखील समाविष्ट करता येणार नाही. इतर बेनिफिट्स वरील प्लानप्रमाणेच आहेत. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3mddbPZ