नवी दिल्ली : ने गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेली Series ला लाँच केले आहे. या सीरिज अंतर्गत Honor Magic 3, आणि Honor Magic 3 Pro+ ला लाँच करण्यात आले आहे. याशिवाय तिन्ही लेटेस्ट स्मार्टफोनमध्ये पॉवरफुल कॅमेरा आणि क्वालकॉमचा लेटेस्ट प्रोसेसर मिळेल. वाचाः Honor Magic 3 चे स्पेसिफिकेशन Honor Magic 3 स्मार्टफोन अँड्राइड ११ आधारित Magic UI ५.० वर काम करतो. स्मार्टफोनमध्ये ६.७६ इंच फुल एचडी+ ओएलईडी डिस्प्ले मिळतो, ज्याचे रिझॉल्यूशन १३४४x२७७२ पिक्सल, रिफ्रेश रेट १२० हर्ट्ज आणि स्क्रीन टू बॉडी रेशियो ८९ टक्के आहे. यामध्ये स्नॅपड्रॅगन ८८८ प्रोसेसर मिळेल. कॅमेरा Honor Magic 3 स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. यात ५० मेगापिक्सल प्रायमरी सेंसर, ६४ मेगापिक्सल ब्लॅक अँड व्हाइट सेंसर आणि १३ मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल लेंस मिळते. फ्रंटला १३ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळेल. बॅटरी Honor Magic 3 स्मार्टफोनमध्ये ४,६०० एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. बॅटरी ६६ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. यासोबतच, डिव्हाइसमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी वाय-फाय, जीपीएस, ब्लूटूथ ५.२ आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट मिळेल. स्मार्टफोनचे वजन २०३ ग्रॅम आहे. Honor Magic 3 Pro चे फीचर्स स्मार्टफोनमध्ये ६.७६ इंच डिस्प्ले देण्यात आला आहे. यामध्ये स्नॅपड्रॅगन ८८८+ प्रोसेसर, १२ जीबी रॅम आणि ५१२ जीबी इंटर्नल स्टोरेज मिळते. फोनमध्ये ६६ वॉट फास्ट चार्जिंग, ५० वॉट वायरलेस चार्जिंग आणि रिव्हर्स चार्जिंग सपोर्टसह ४,६०० एमएएचची बॅटरी मिळते. फोन अँड्राइड ११ वर आधारित Magic UI ५.० वर काम करतो. कॅमेरा आणि कनेक्टिव्हिटी या फोनमध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यामध्ये ५० मेगापिक्सलचा प्रायमरी सेंसर, ६४ मेगापिक्सल ब्लॅक अँड व्हाइट सेंसर, तिसरा ६४ मेगापिक्सल पेरिस्कोप लेंस आणि चौथा १३ मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल लेंस मिळेल. सेल्फीसाठी १३ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो. याशिवाय वाय-फाय, जीपीएस आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट मिळेल. Honor Magic 3 Pro+ चे स्पेसिफिकेशन Honor Magic 3 Pro+ स्मार्टफोनमध्ये कॅमेरा सोडून सर्व फीचर्स जवळपास प्रो मॉडेल सारखेच आहेत. यामध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यामध्ये ५० मेगापिक्सल OIS सेंसर आणि तीन ६४ मेगापिक्सल लेंस मिळते. याचा कॅमेरा ३.५ एक्स ऑप्टिकल झूम, १०एक्स हायब्रिज झूम आणि १०० एक्स डिजिटल झूम सपोर्ट करतो. फ्रंटमध्ये १३ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळेल. Honor Magic 3 series ची किंमत
- Honor Magic 3 स्मार्टफोनच्या ८ जीबी + १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ४,५९९ युआन (जवळपास ५२,८०० रुपये)
- Honor Magic 3 स्मार्टफोनच्या ८ जीबी + २५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ४,९९९ युआन (जवळपास ५७,३०० रुपये)
- Honor Magic 3 Pro स्मार्टफोनच्या ८GB + २५६GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ५,९९९ युआन (जवळपास ६८,८०० रुपये)
- Honor Magic 3 Pro स्मार्टफोन १२GB + ५१२GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ६७९९ युआन (जवळपास ७८,००० रुपये)
- Honor Magic 3 Pro+ स्मार्टफोनच्या १२ जीबी + ५१२ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ७,९९९ युआन (जवळपास ९१,८०० रुपये)
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3jTNzES