नवी दिल्लीः रिलायन्स जिओचा स्वस्त ४ जी फोनची घोषणा जवळपास दोन महिन्यापूर्वी झाली होती. त्यानंतर आता या फोनचे फीचर्स ऑनलाइन समोर आली आहेत. Jio Phone Next ला जून मध्ये Reliance AGM 2021 मध्ये लाँच करण्यात आले होते. त्यावेळी कंपनीने केवळ फोनच्या डिझाइनचा खुलासा करण्यात आला होता. तसेच काही फीचर्सला टीज केले होते. या फोनच्या हार्डवेयर संबधी कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. आता एक्सडीए डेव्हलपरच्या मिशाल रहेमानने १० सप्टेंबर पासून भारतात या फोनचा सेल सुरू होण्याआधी जिओ फोन नेक्स्ट च्या फीचर्सचा खुलासा केला आहे. रिलायन्स आणि गुगल (Reliance & Google) चा स्वस्त ४जी स्मार्टफोनमध्ये कोणकोणते फीचर्स असणार आहेत, जाणून घ्या. वाचाः ची किंमत Reliance Jio ने आतापर्यंत JioPhone Next च्या किंमतीवरून कोणताही खुलासा केला नाही. कंपनीचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी फोला लाँच करताना सांगितले होते की, फोनला खूपच कमी किंमतीत लाँच केले जाणार आहे. हा फोन जगातील सर्वात स्वस्त 4G स्मार्टफोन असणार आहे. JioPhone Next ची किंमत ५ हजार रुपयांपेक्षा कमी असू शकते. वाचाः JioPhone Next ची रिलीज तारीख Reliance ने आपल्या एजीएम दरम्यान एक घोषणा केली होती की, JioPhone Next ला १० सप्टेंबर रोजी मार्केटमध्ये उपलब्ध करण्यात येणार आहे. यासाठी कंपनीने गणेश चतुर्थीचा शुभ दिवस निवडला आहे. वाचाः JioPhone Next चे फीचर्स JioPhone Next च्या पॉलिकार्बोनेट बॅक पॅनेल सोबत आणले गेले आहे. यात पिल शेप्ड कॅमेरा मॉड्यूल दिले आहे. सोबत एलईडी फ्लॅश दिला आहे. फोनमध्ये स्पीकर ग्रिल दिले आहे. फोनचा टॉप आणि बॉटम थोडे पॅनेल मोठे आहे. सोबत सेल्फी कॅमेरा आहे. या फीचर्सला अधिकृत पणे जाहीर करण्यात आले नाही. जिओने फोनची घोषणा करताना सांगितले की, हा 4G कनेक्टिविटीवर काम करणार आहे. सोबत एक स्पेशल व्हर्जनच्या अँड्रॉयडवर काम करेल. JioPhone Next च्या प्रमोशनल पिक्चर्स नुसार, फोनमध्ये Camera Go अॅपला स्पॉट करण्यात आले आहे. वाचाः या स्मार्टफोनमध्ये गुगल असिस्टेंट, टेक्स्ट टू स्पीच क्षमता, लँग्वेज ट्रान्सलेशन, स्मार्ट कॅमेरा सारखे फीचर्स दिले आहेत. या फीचर्स शिवाय, गुगलने घोषणा करून सांगितले की, ते लेटेस्ट अँड्रॉयड रिलीज आणि सिक्योरिटी अपडेट्ससाठी युजर सपोर्ट उपलब्ध करणार आहे. या फोनमध्ये देण्यात येणाऱ्या कॅमेरा अॅपला गुगल जिओचे को इंजिनियर्डकडून बनवले जाणार आहे. हा कॅमेरा नाइट मोड, एचडीआर आणि स्नॅपचॅट एआर फिल्टर्स सारखे फीचर्स दिले आहे. लीक्सनुसार, JioPhone Next यूनिसॉक प्रोसेसर आणि ४ जीबी रॅम दिले आहे. सोबत ३२ जीबी इंटरनल स्टोरेज दिले आहे. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3COelaC