नवी दिल्ली : चा नवीन ४० इंच Infinix X1 भारतात लाँच झाला आहे. याआधी कंपनीने ३२ इंच आणि ४३ इंच स्मार्ट टीव्ही भारतात लाँच केले आहेत. ४० अँड्राइड स्मार्ट टीव्हीची किंमत १९,९९९ रुपये आहे. मात्र, ही लाँचिंग किंमत आहे. टीव्हीची विक्री फ्लिपकार्टच्या माध्यमातून सुरू झाली आहे. या स्मार्ट टीव्हीविषयी सविस्तर जाणून घेऊया. वाचाः डिजाइन आणि डिस्प्ले Infinix X1 ४० स्मार्ट टीव्हीचे डिझाइन स्लिम आहे व दिसायला देखील आकर्षक आहे. बेझल लेस फ्रेममुळे टीव्ही पाहताना अधिक आनंद मिळतो. याची बॉडी ब्लॅक रंगात असून, कनेक्टिव्हिटीसाठी यात ३HDMI पोर्ट्स, २USB पोर्ट्स, ब्लूटूथ v५.० आणि Wi-Fi ची सुविधा मिळते. यामध्ये फुल एचडी+ डिस्प्ले मिळतो, याचे ब्राइटन्स ३५० आहे. डिस्प्ले एचडीआर १० आणि HLG सपोर्टसह येतो. चांगल्या पिक्चर क्वालिटीसाठी यात EPIC २.० इमेज इंजिन सपोर्ट मिळेल. टीव्ही ६० हर्ट्ज रिफ्रेश रेटने सुसज्ज असून, व्हिडीओ क्वालिटी स्मूथ आहे. यात अनेक व्हिडीओ फॉर्मेट्सचा सपोर्ट मिळेल. साउंड टीव्हीमध्ये ब्लू लाइट रिडक्शन टेक्नोलॉजी आणि EyeCare टेक्नोलॉजी सपोर्ट देण्यात आली आहे. यामुळे डोळ्यांची सुरक्षा होते. टीव्ही बघताना डोळ्यांवर दबाव येऊ नये यासाठी आय केअर टेक्नोलॉजी देण्यात आली आहे. यामध्ये २४ वॉटचे स्पीकर आहेत, ज्यासोबत डॉल्बी ऑडिओ साउंडचा सपोर्ट मिळेल. साउंड क्वालिटीच्या बाबतीत तुम्हाला उत्तम अनुभव मिळेल. Netflix, Prime Video, YouTube सारख्या ५ हजार अॅप्सचा सपोर्ट मिळतो. टीव्हीसोबत फुल फंक्शन रिमोट देखील मिळतो. रिमोटमध्ये ओटीटीसाठी वेगवेगळी बटनं मिळतात. उत्तम परफॉर्मेंससाठी टीव्हीमध्ये मीडियाटेक MTK ६६८३ प्रोसेसर देण्यात आला आहे, ग्राफिक्ससाठी माली-४७० जीपीयू देण्यात आला आहे. यात १ जीबी रॅम आणि ८ जीबी स्टोरेज मिळते. टीव्हीमध्ये गुगल प्ले-स्टोरचा सपोर्ट मिळेल. Infinix x1 ४० इंच स्मार्ट टीव्ही , , आणि Kodak सारख्या ब्रँड्सला टक्कर देईल. कमी किंमतीमुळे हा टीव्ही ग्राहकांना नक्कीच आवडू शकतो. यामध्ये शानदार डिस्प्ले आणि साउंड क्वालिटी मिळते. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3ADQmIW