नवी दिल्ली : लवकरच नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन लाँच करणार आहे. सर्वसाधारपणपणे सप्टेंबरमध्ये कंपनीचा इव्हेंट असतो. यात सीरिज लाँच करण्याची शक्यता आहे. लाँचिंग आधीच नेहमीप्रमाणेच लीक्स समोर येत आहे. अंतर्गत , iPhone 13, आणि ला लाँच केले जाण्याची शक्यता आहे. रिपोर्टनुसार, आयफोन १३ मध्ये १२० हर्ट्ज हाय रिफ्रेश रेट डिस्प्ले दिला जाईल व इन डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर मिळेल. याशिवाय कंपनी कॅमेऱ्यात देखील मोठा बदल करणार आहे. वाचाः एका रिपोर्टनुसार, आयफोन १३ सीरिजमध्ये व्हिडीओ रेकॉर्डिंगसाठी बोके इफेक्ट मिळेल. आतापर्यंत केवळ फोटोमध्येच बॅकग्राउंड ब्लर म्हणजे बोके इफेक्ट मिळत असे. डिझाइनबद्दल सांगायचे तर नवीन सीरिजमध्ये डिझाइनमध्ये जास्त बदल पाहायला मिळणार नाही. डिझाइन आयफोन १२ सीरिजप्रमाणेच असेल. हार्डवेअरमध्ये थोडे बदल असतील. डिझाइनमध्ये काही ट्विक्स असतील ज्यामुळे फोन नवीन असल्यासारखा वाटेल. रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, आयफोन १३ च्या कॅमेरा मॉड्यूलमध्ये काही बदल पाहायला मिळतील. कंपनी फेस आयडीचा आकार कमी करू शकते. जुन्या फेस आयडीच्या तुलनेत ४० ते ५० टक्के लहान असेल. आणखी एका रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, आयपोन १३ प्रो मध्ये ३०९५ एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. आयफोन १२ मध्ये २८१५ एमएएचची बॅटरी मिळते. असे झाल्यास कमीत कमी बॅटरीच्या बाबतीत मोठा बदल असेल. इंटरनेटवर आयफोन १३ चे अनेक रेंडर्स पाहण्यात आले आहेत. यानुसार, कंपनी कॅमेरा मॉड्यूलला वेगळा आकार देईल. याशिवाय १ टीबीपर्यंत स्टोरेज व्हेरिएंट मिळू शकते. आयफोन १३ च्या कॅमेऱ्यामध्ये सिक्स एलिमेंट लेंस सेटअप यूज केला जाईल. आयफोन १३ सीरिज कधी लाँच होईल याची तारीख सध्या स्पष्ट नाही. कंपनी सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात इव्हेंटचे आयोजन करू शकते. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3sbA5bv