नवी दिल्ली : चीनी निर्माता कंपनी नवीन हँडसेट लाँच करण्याच्या तयारीत आहे. कंपनी १७ ऑगस्टला या स्मार्टफोनला लाँच करणार आहे. रिपोर्टनुसार, या स्मार्टफोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८८८+ प्रोसेसर मिळू शकतो. वाचाः iQoo 8 स्मार्टफोनमध्ये २k डिस्प्ले मिळू शकतो. याचा रिफ्रेश रेट १२० हर्ट्ज असेल. कंपनीने चीनी मायक्रो ब्लॉगिंग वेबसाइट वर याबाबतची माहिती दिली आहे. या फोनला चीनमध्ये लाँच केले जाईल. iQoo 8 मध्ये AMOLED E5 LTPO 10 बिट स्क्रीनचा वापर केला जाईल. रिपोर्टनुसार, फोनमध्ये १२ जीबी रॅम आणि२५६ जीबी इंटर्नल स्टोरेज मिळेल. हा स्मार्टफोन अँड्राइड ११ वर आधारित Origin OS १.० वर काम करेल. फोनमध्ये १४४०x३२०० पिक्सल रिझॉल्यूशनचा डिस्प्ले मिळेल. डिस्प्लेमध्ये पंच होल असेल. डिस्प्ले कर्व्ड असेल. यात सॅमसंगच्या एमोलेड डिस्प्ले पॅनेलचा वापर करण्यात आल्याची शक्यता आहे. स्मार्टफोनचा लाँच इव्हेंट चीनमध्ये होणार असून, कंपनी याचे लाइव्हस्ट्रीम करेल. कंपनीने टीझर देखील जारी केला आहे. परंतु, टीझरमध्ये फोनचे डिझाइन क्लिअर नाही. iQoo 8 ला भारतात कधी लाँच केले जाईल याची माहिती कंपनीने अद्याप दिलेली नाही. परंतु, या सेगमेंटमध्ये स्मार्टफोनची वाढती मागणी पाहता कंपनी लवकरच फोनला भारतात लाँच करू शकते. दरम्यान, iQoo कंपनी विवोचाच भाग आहे. मात्र, कंपनीनुसार, भारतात दोन्ही स्वतंत्र आहेत. iQoo भारतात गेमिंग यूजर्सला टार्गेट करत स्मार्टफोन सादर करते. iQoo ने भारतात काही नवीन स्मार्टफोन्स देखील लाँच केले आहेत व याची लोकप्रियता वाढत आहे. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2WUHcJK