नवी दिल्लीः रिलायन्स जिओचा नवीन फोन (JioPhone Next) ला पुढील महिन्यात लाँच केले जाणार आहे. या फोनची अनेकांना उत्सूकता आहे. या सर्व युजर्संसाठी एक चांगली बातमी आहे. ची किंमत ऑनलाइन समोर आली आहे. याशिवाय, या फोनचे स्पेसिफिकेशंस ऑनलाइन लीक समोर आले आहेत. जिओ फोन नेक्स्टला रिलायन्स जिओने Google सोबत पार्टनरशिपमध्ये डेव्हलप केले आहे. हा फोन Android 11 (Go Edition) वर काम करणार आहे. वाचा: फोनमध्ये असू शकतो ५.५ इंचाचा HD डिस्प्ले एका लीक माहितीनुसार, JioPhone Next मध्ये ५.५ इंचाचा एचडी डिस्प्ले असू शकतो. हा फोन २ स्टोरेज ऑप्शनमध्ये येवू शकतो. सोबत हा 4G VoLTE कनेक्टिविटी सोबत येवू शकतो. JioPhone Next ची घोषणा रिलायन्स इंडस्ट्रीजच्या ४४ व्या एजीएम मध्ये करण्यात आली होती. जिओ फोन नेक्स्ट मार्केट मध्ये गणेश चतुर्थी म्हणजेच १० सप्टेंबर २०२१ पासून उपलब्ध करण्यात येणार आहे. वाचा: JioPhone Next ची किंमत ३ हजार ४९९ रुपये असू शकते फेमस टिप्स्टर योगेशने एक ट्विट करून ही माहिती दिली आहे. JioPhone Next ची किंमत ३ हजार ४९९ रुपये असू शकते. भारतात या स्मार्टफोनची विक्री १० सप्टेंबर पासून सुरू होणार आहे. याआधी आलेल्या काही रिपोर्ट्स मध्ये म्हटले होते की, जिओ फोन नेक्स्टची किंमत ५० डॉलर पेक्षा कमी असू शकते. वाचा: फोनमध्ये असू शकतो १३ मेगापिक्सलचा मेन कॅमेरा JioPhone Next च्या Android 11 (Go Edition) सोबत येण्याची शक्यता आहे. हा स्मार्टफोन क्वॉलकॉम QM215 प्रोसेसर सोबत येवू शकतो. हा फोन २ जीबी रॅम किंवा ३ जीबी रॅम सोबत येवू शकतो. फोनमध्ये १६ जीबी किंवा ३२ जीबीचे इंटरनल स्टोरेज दिले जावू शकते. फोनमध्ये मेन कॅमेरा १३ मेगापिक्सलचा असू शकतो. तर सेल्फीसाठी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनच्या फ्रंट मध्ये ८ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला जावू शकतो. फोनमध्ये 2,500 mAh ची बॅटरी दिली जावू शकते. वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2XB41m6