Full Width(True/False)

शानदार Pair ! Realme GT 5G आणि Realme GT Master Edition आज येणार भारतात, पाहा डिटेल्स

नवी दिल्ली: आणि आज भारतात लाँच होणार आहे. हे कंपनीचे 5G स्मार्टफोन असतील. Realme GT 5G फ्लॅगशिप मॉडेल असेल जे क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८८८८ प्रोसेसरसह दिले जाईल. तर, Realme GT 5G मास्टर एडिशन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ७७८ G प्रोसेसरसह दिले जाईल. हे दोन्ही स्मार्टफोन फिचर्सच्या बाबतीत जबरदस्त असतील. Master Edition ची किंमत आणि वैशिष्ट्यासह तुम्हाला लाँच इव्हेन्ट कुठे पाहता येईल त्याबद्धल जाणून घ्या डिटेलमध्ये. वाचा: Realme GT 5G आणि Realme GT Master Edition लाँच इव्हेन्ट Realme GT 5G आणि Realme GT Master Edition चे Live streaming पाहण्यासाठी, तुम्हाला कंपनीच्या अधिकृत YouTube आणि Facebook चॅनेलला भेट देणे आवश्यक आहे. त्याचा प्रक्षेपण कार्यक्रम येथे दुपारी १२.३० वाजता सुरू होईल. भारताशिवाय, Realme Book देखील आज चीनमध्ये लाँच करण्यात येईल. तिथल्या वेळेनुसार, भारतीय वेळेनुसार रात्री १२.३० वाजता लाँच होईल. Realme GT 5G आणि Realme GT Master Edition ची अपेक्षित किंमत: सध्या Realme GT 5G च्या किंमतीबद्दल माहिती उपलब्ध नाही .रियलमी इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी माधव सेठ यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते की, या फोनची किंमत ३०,००० रुपयांपासून ते ३५,००० रुपयांपर्यंत असेल. Realme GT मास्टर एडिशन चीन मध्ये CNY २,३९९९ च्या सुरुवातीच्या किंमतीत म्हणजे सुमारे २७,५०० रुपयांत लाँच करण्यात आला होता. Realme GT 5G ची संभाव्य वैशिष्ट्ये: यात ६.४३ इंच फुल एचडी+ एमोलेड डिस्प्ले आहे जो१२० Hz रिफ्रेश रेट आणि ३६० Hz च्या टच सॅम्पलिंग रेटसह येईल. हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८८८ प्रोसेसरने सुसज्ज असेल. याशिवाय १२ जीबी पर्यंत रॅम देखील दिली जाईल. हा फोन ट्रिपल रियर कॅमेरासह येईल. त्याचे प्राथमिक सेन्सर ६४ मेगापिक्सेल असेल, जो सोनी IMX६८२ सेन्सरसह येईल. दुसरा ८ मेगापिक्सलचा वाइड अँगल शूटर असेल. तिसरा २ मेगापिक्सलचा मॅक्रो शूटर असेल. तसेच, १६ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा असेल. फोनमध्ये २५६ GB पर्यंत स्टोरेज दिले जाऊ शकते. यासह, ४५०० mAh ची बॅटरी देखील यात मिळण्याची शक्यता आहे जी ६५ W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. Realme GT Master Edition ची संभाव्य वैशिष्ट्ये: यात ६. ४३ इंच फुल एचडी+ सुपर एमोलेड डिस्प्ले आहे जो १२० Hz रिफ्रेश रेट आणि ३६० Hz च्या टच सॅम्पलिंग रेटसह येईल . हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ७७८ G प्रोसेसरने सुसज्ज असेल. याशिवाय ८ जीबी पर्यंत रॅम देखील दिली जाईल. हा फोन ट्रिपल रियर कॅमेरासह येईल. ज्याचे प्राथमिक सेन्सर ६४ मेगापिक्सेल असेल. दुसरा ८ मेगापिक्सलचा वाइड अँगल शूटर असेल. तिसरा २ मेगापिक्सलचा मॅक्रो शूटर तसेच ३२ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा असेल. फोनमध्ये २५६ GB पर्यंत स्टोरेज दिले जाऊ शकते. यासह, ४३०० mAh ची बॅटरी देखील यात मिळण्याची शक्यता आहे जी ६५ W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3iSO1nw