Full Width(True/False)

ज्युनिअर एनटीआर झाला देशातील पहिल्या Lamborghini गाडीचा मालक

मुंबई : दाक्षिणात्य मेगास्टार याला गाड्यांची प्रचंड आवड आहे. त्याच्या ताफ्यामध्ये एकाहून एक सरस अशा आलिशान गाड्या आहेत. आता त्याच्या ताफ्यामध्ये सर्वात महागडी आणि भारतातील पहिलीवहिली अशी लॅम्बोर्गिनी उरुस ग्रेफाइट या गाडीचा समावेश झाला आहे. एसएस राजामौलींच्या सिनेमाची तयारी सुरू असताना लॅम्बोर्गिनी उरुस ग्रेफाइट कॅप्सूल ही गाडी त्याने विकत घेतली. ज्युनिअर एनटीआरने ही गाडी बंगळुरूमधील शोरूममधून विकत घेतली. ही गाडी निरो नॉक्‍ट‍िस मॅट आणि अरासिंयो आर्गोस कॉन्‍ट्रास्‍ट कलरमध्ये उपलब्ध आहे. दरम्यान, ज्युनिअर एनटीआर रशियामध्ये सिनेमाचे चित्रीकरण करत आहे. तो भारतात परत आल्यानंतर ही गाडू चालवू शकणार आहे. लॅम्बॅर्गिनी उर्स आणि उर्स पीकचे प्रीमिअर व्हर्जन सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारतामध्ये लॅम्बोर्गिनी उरुस ग्रेफाइट कॅप्सूल अलिकडेच लाँच केली. ही गाडी म्हणजे लॅम्बोर्गिनी उरुस आणि उरुस पीकचे प्रीमिअर व्हर्जन आहे. लॅम्बोर्गिनी उरुस आणि उरुस पीक या गाड्यांची एक्स शोरूम किंमत ३.१५ कोटी रुपये आहे. परंतु कंपनीने अधिकृतरित्या लॅम्बोर्गिनी उरुस ग्रेफाइट कॅप्सूल या गाडीची किंमत किती असेल याचा खुलासा केलेला नाही. ही एकमेव गाडी सध्या कंपनीने लाँच केली आहे. परंतु या गाडीची किंमत ४ ते ४.५ कोटी रुपये असण्याची शक्यता आहे. १२ सेकंदामध्ये ०-२०० किमी प्रतितास वेग लॅम्बोर्गिनीची ही आलिशान गाडी ३.६ सेकंदामध्ये ० ते १०० किमी प्रति तास इतका वेग घेऊ शकते. तर २०० किमी प्रती तास वेगाने धावण्यासाठी या गाडीला अवघे १२.८ सेकंदच लागतात. लॅम्बोर्गिनी उरुस ग्रेफाइट कॅप्सूलचा सर्वोत्तम वेग ३०५ किमी प्रति तास एवढा आहे. या एसयूवी गाडीमध्ये तीन एफटी स्क्रीन्स लावले आहे. तर यामध्ये सहा ड्रायविंग मोड आहेत. केबीसी तेलगूचे सूत्रसंचालन करणार ज्युनिअर एनटीआर ज्युनिअर एनटीआरच्या कामाबद्दल सांगायचे तर त्याच्या हातात मोठा प्रोजेक्ट आला आहे. तो लवकरच कौन बनेगा करोडपती तेलगू या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहे. या कार्यक्रमाच्या पहिल्या भागात अभिनेता राम चरण पाहुणा म्हणून सहभागी होणार आहे. आरआरआर मध्येही दिसणार याशिवाय ज्युनिअर एनटीआर आगामी आरआरआर या बहुचर्चित सिनेमातही दिसणार आहे. यामध्ये त्याच्यासोबत रामचरण, अजय देवगण,आलिया भट्ट हे कलाकार दिसणार आहेत. हा सिनेमा पाच वेगवेगळ्या भाषांमध्ये जगभरात प्रदर्शित होणार आहे. याशिवाय हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवरही प्रदर्शित होणार आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3k69J6Z