नवी दिल्लीः मोटोरोला भारतीय बाजारात आपले दोन नवीन स्मार्टफोन आणि लाँच करणार आहे. या फोनची लाँचिंग १७ ऑगस्ट रोजी होणार आहे. फोनची विक्री ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट फ्लिपकार्ट वर उपलब्ध होणार आहे. Flipkart वर दोन्ही फोन्सला लिस्ट करण्यात आले आहे. फ्लिपकार्ट लिस्टिंगमध्ये या स्मार्टफोन्सची सर्व प्रमुख फीचर्सचा खुलासा झाला आहे. वाचाः Motorola Edge 20 चे संभावित फीचर्स कंपनीने फ्लिपकार्टवर दावा केला आहे की, भारतातील हा सर्वात स्लीम ५जी स्मार्टफोन असेल. याची रुंदी फक्त 6.99mm असेल. फोटोत हा फोन एकदम प्रीमियम दिसत आहे. यात मागे तीन रियर कॅमेरा सेटअप आणि मेटल बॉडी फ्रेम दिसत आहे. फ्लिपकार्टच्या माहितीनुसार, यात AMOLED डिस्प्ले दिला जाणार आहे. जो 144Hz रिफ्रेश रेट आणि HDR10+ सपोर्ट करेल. यात 8GB रॅम आणि Snapdragon 778 प्रोसेसर दिला जाणार आहे. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाणार आहे. याचा प्रायमरी सेन्सर १०८ मेगापिक्सलचा असेल. याचे खास वैशिष्ट्ये म्हणजे यात 30X ची झूम सुविधा दिली आहे. सोबत १६ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड लेन्स आणि ८ मेगापिक्सलचा टेलिफोटो लेन्स मिळेल. फोन अँड्रॉयड ११ ऑपरेटिंग सिस्टमवर काम करेन. फोनमध्ये 4,000mAh ची बॅटरी दिली जावू शकते. जी 30W फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. वाचाः Motorola Edge 20 Fusion चे संभावित फीचर्स या फोनचा खुलासा आता फ्लिपकार्टवर झाला आहे. या स्मार्टफोनमध्ये ६.७ इंचाचा ओलेड डिस्प्ले दिला जावू शकतो. जे 90Hz रिफ्रेश रेटचा असेल. फोनमध्ये 8GB रॅम सोबत ऑक्टा कोर मीडियाटेक डायमेंशन ७२० प्रोसेसर मिळण्याची शक्यता आहे. या फोनमध्ये ट्रिपर रियर कॅमेरा सेटअप मिळण्याची शक्यता आहे. ज्यात १०८ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड शूटर आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे. सेल्फीसाठी यात ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाईल. या फोनमध्ये 5,000mAh च्या बॅटरी सोबत 30W TurboPower फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळेल. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3ADAt5E