आजकाल अनेक जण स्मार्टफोन खरेदी करण्यापूर्वी त्यातील कॅमेरा कसा आहे हे आवर्जून पाहतात. चांगल्या कॅमेऱ्याची पहिली अट स्मार्टफोनचा लेन्स कसा असावा ? जर स्मार्टफोनमध्ये अधिक मेगापिक्सेलचा लेन्स असेल तर ते चांगल्या कॅमेऱ्याचे लक्षण आहे. आजकाल मोबाईल कॅमेरामध्येच मस्त कॅमेरे असतात. ज्यामुळे इतर कॅमेराची गरज भासत नाही. आणि कदाचित यामुळेच बाजारात चांगल कॅमेरा असलेल्या स्मार्टफोनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वाढत्या मेगापिक्सेलसह, स्मार्टफोनची किंमत देखील वाढते. त्यामुळे प्रत्येकाला १०८ MP कॅमेरा असलेला स्मार्टफोन खरेदी करणे शक्य होत नाही. परंतु, बाजारात सध्या १०८ एमपी कॅमेरा फोन बजेट किंमतीत उपलब्ध आहेत, जे २०,००० रुपयांपेक्षा कमी किंमतीत येतात. आज आम्ही येथे तुम्हाला १०८ मेगापिक्सल कॅमेर्यासह स्वस्त स्मार्टफोनबद्धल सांगत आहोत. यात रिअलमी, मोटोरोला सारख्या अनेक लोकप्रिय स्मार्टफोन कंपनींच्या मोबाईलचा समावेश आहे.

Motorola Edge Fusion
मूळ किंमत - २१,४९९ रुपये
फोनची किंमत २१,४९९ रुपये आहे. पण डिस्काउंट नंतर तुम्ही २०,००० रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करू शकाल. फोनमध्ये ६.७ इंचाचा फुल एचडी + प्लस डिस्प्ले देण्यात आला असून फोन आयफोन ऑक्टा-कोर मीडियाटेक 9800U 5G सपोर्टसह येईल.या फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. त्याचा प्राथमिक कॅमेरा १०८MP आहे. याशिवाय ८ एमपी अल्ट्रा-वाइड लेन्स आणि २ एमपी डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये ३२ एमपी कॅमेरा आहे.
Mi 10i
किंमत - २०,९९९ रुपये
Mi 10i स्मार्टफोन २०,००० रुपयांपेक्षा कमी सूटवर खरेदी केला जाऊ शकतो. स्मार्टफोनमध्ये ६.६७ -इंच फुल एचडी डिस्प्ले आहे. फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ७५० G प्रोसेसर सपोर्ट देण्यात आला आहे. शाओमीने फोनमध्ये क्वाड कॅमेरा सेटअप दिला आहे, ज्यात पहिला १०८ MP सॅमसंग HM2 सेन्सर आहे, दुसरा ८MP अल्ट्रा वाइड अँगल लेन्स, तिसरा २ MP मॅक्रो लेन्स आणि चौथा कॅमेरा २ एमपी डेप्थ सेन्सर असून फ्रंटमध्ये १६ एमपीचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.
Redmi Note 10 Pro Max
किंमत - १८,९९९ रुपये
हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ७३२ G प्रोसेसरवर सादर करण्यात आला आहे आणि हा अँड्रॉइड ११ वर आधारित MIUI १२ ला सपोर्ट करेल. रेडमी नोट १० प्रो मॅक्सच्या मागील बाजूस क्वाड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. त्याचा प्राथमिक कॅमेरा १०८ MP तिसरी पिढी ISOCELL HM2 आहे. याशिवाय ८ MP अल्ट्रा वाइड अँगल, ५MP सुपर मॅक्रो लेन्स आणि २MP डेप्थ सेंसर असून सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी २० एमपीचा लेन्स देण्यात आला आहे.
Realme 8 pro
किंमत - १७,९९९ रुपये
Realme 8 Pro स्मार्टफोनमध्ये ६.४ इंचाचा सुपर AMOLED OLED डिस्प्ले देण्यात आला असून फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ७२० G ला सपोर्ट आहे. फोनमध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. त्याचा प्राथमिक कॅमेरा १०८ MP सॅमसंग ISOCELL HM2 आहे. याशिवाय८ एमपी ११९ डिग्री अल्ट्रा वाइड अँगल लेन्स, २ एमपी मॅक्रो लेन्स आणि २ एमपी बी अँड डब्ल्यू पोर्ट्रेट लेन्स समर्थित असतील.
MOTO G 60
किंमत - १७,९९९ रुपये
या स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन ७३२ जी प्रोसेसर सपोर्ट करण्यात आला आहे. फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. यात पहिला १०८MP प्राथमिक सेन्सर, दुसरा ८MP अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि तिसरा २ MP डेप्थ सेन्सर आहे. तर सेल्फीसाठी समोर ३२ MP कॅमेरा देण्यात आला आहे. Moto G60 स्मार्टफोन ६००० mAh बॅटरी समर्थित आहे, जी २० W फास्ट चार्जिंग आणि क्वालकॉम क्विक चार्ज ४.० ला सपोर्ट करते.
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2Ur7sKO