नवी दिल्ली : ने भारतात आपली नवीन ColorFit Pro 3 Assist आणि Noise Buds VS103 ट्रू वायरलेस स्टेरियो (TWS) इयरबड्सला लाँच केले आहे. नवीन वॉचमध्ये रेक्टँग्यूलर आकाराचे डायल आहे व यात SpO2 मॉनिटरिंग, १४ स्पोर्ट्स मोड्स आणि हार्ट रेट मॉनिटरिंग सारखे फीचर्स मिळतात. वाचाः ची किंमत ५,९९९ रुपये आहे. जेट ब्लॅक, जेट ब्लू, रोज पिंक, स्मोक ग्रीन आणि स्मोक ग्रे रंगात येणाऱ्या या वॉचला कंपनीच्या वेबसाइटवरून ३,९९९ रुपयात खरेदी करू शकता. तर ची किंमत २,९९९ रुपये आहे. पांढऱ्या आणि काळ्या रंगात येणाऱ्या या इयरबड्सला Amazon वरून १,४९९ रुपयात खरेदी करू शकता. Noise ColorFit Pro 3 Assist चे स्पेसिफिकेशन्स या स्मार्टवॉचमध्ये ३२०x३६० पिक्सल रिझॉल्यूशनसोबत १.५५ इंच TFT-LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. यात उजव्या बाजूला सिंगल बटन देण्यात आले आहे. यामध्ये हार्ट रेट सेंसर, SpO2 सेंसर, एक्सीलेरोमीटर आणि Alexa सपोर्ट देण्यात आला आहे. वॉचमध्ये फाइंड माय फोन, हँड वॉश रिमाइंडर्स आणि वेक जेस्चर्स सारखे फीचर्स मिळतील. यासोबतच, स्ट्रेस मॉनिटरिंग, स्लीप ट्रॅकिंग, स्पोर्ट्स मोड्स आणि एक्टिव्हिटी हिस्ट्री सारखे फीचर्स मिळतील. वॉच ५ ATM पर्यंत वॉटर रेसिस्टेंस आहे. याची बॅटरी सिंगल चार्जमध्ये १० दिवस टिकते. यामध्ये ३०० एमएएचची बॅटरी देण्यात आली असून, चार्ज होण्यासाठी २ तास लागतात. वॉच अँड्राइड आणि आयओएस डिव्हाइस सपोर्ट करते. Noise Buds VS103 चे स्पेसिफिकेशन्स इयरबड्समध्ये १०एमएम ड्राइव्हर्स देण्यात आले असून, यात टच कंट्रोल्स देखील आहे. याद्वारे तुम्ही फोन आणि मीडिया कंट्रोल करू शकता. वॉइस असिस्टेंट एक्टिव्हेट करता येईल. कंपनीचा दावा आहे की याची बॅटरी १८ तास टिकेल. चार्जिंगसाठी यूएसबी टाइप-सी पोर्ट देण्यात आले आहे. यात क्विक पेयरिंग टेक्नोलॉजी देखील देण्यात आली आहे. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3fzUtxI