नवी दिल्ली: नुकत्याच लाँच झालेलया आणि लॅपटॉपचा पहिला सेल आज दुपारी १२ पासून होत असून यासोबत अनेक ऑफर्सही दिल्या जात आहेत. RedmiBook Pro हा वर्क फ्रॉम होमसाठी एक चांगला पर्याय आहे. तर, RedmiBook e-Learning Edition विद्यार्थ्यांसाठी एक चांगला पर्याय आहे. हे दोन्ही लॅपटॉप प्रीलोडेड विंडोज १० होम आणि मायक्रोसॉफ्ट ऑफिस होम आणि स्टुडंट एडिशन २०१९ सह सादर केले गेले आहेत. तसेच, दोघांना विनामूल्य विंडोज ११ मध्ये अपग्रेड केले जाऊ शकते. विक्री दरम्यान काही ऑफर दिल्या जात आहेत. वाचा: RedmiBook Pro आणि RedmiBook e-Learning Edition किंमत आणि ऑफर: RedmiBook Pro च्या ८ जीबी रॅम आणि ५१२ जीबी स्टोरेजची किंमत ४९,९९९ रुपये आहे. त्याचबरोबर RedmiBook ई-लर्निंग एडिशनच्या ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेजची किंमत ४१,९९९ रुपये आहे. तर , ८ जीबी आणि ५१२ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ४४,९९९ रुपये आहे. ई-कॉमर्स वेबसाइटवर या दोन्ही लॅपटॉपसोबत एचडीएफसी कार्ड ऑफरही दिली जात आहे. एचडीएफसी बँक कार्ड किंवा ईएमआय व्यवहाराद्वारे ग्राहकांनी त्यांचे पेमेंट केल्यास त्यांना ३,५०० रुपयांपर्यंत त्वरित सूट दिली जाईल. तर रेडमी बुक ई-लर्निंग आवृत्तीला एचडीएफसी बँक कार्डद्वारे २,५०० रुपयांपर्यंत त्वरित सूट मिळेल. याशिवाय, अॅक्सिस, आयसीआयसीआय बँक कार्डवर १० टक्के त्वरित सूट देखील दिली जाईल. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3Ag0He1