Full Width(True/False)

Realme GT सीरीजची किंमत लाँचआधीच लीक, १८ ऑगस्टला भारतात फोनची लाँचिंग

नवी दिल्लीः सीरीज भारतात १८ ऑगस्ट रोजी लाँच करण्यात येणार आहे. या सीरीज अंतर्गत कंपनी दोन हँडसेट्स Realme GT 5G आणि Realme GT Master Edition लाँच करणार आहे. रियलमी टाइम्सच्या रिपोर्ट नुसार, हे फोन तीन कलर ऑप्शन आणि दोन व्हेरियंट ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज आणि १२ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेज मध्ये येतील. तसेच रियलमी GT मास्टर एडिशनची किंमत ३० हजार रुपयांपेक्षा कमी असू शकते. याची सुरुवातीची किंमत २५ हजार ९९९ रुपये असू शकते. वाचा: फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स या सीरिजच्या दोन्ही हँडसेट्समध्ये कंपनी 1080x2400 पिक्सल रेजॉलूशन सोबत ६.४३ इंचाचा फुल एचडी प्लस सुपर अमोलेड डिस्प्ले ऑफर करतो. डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz असेल. हे स्लीम बेजल्स सोबत येईल. GT 5G ला कंपनी डॅशिंग सिल्वर, डॅशिंग ब्लू, आणि रेसिंग येलो कलर मध्ये आणणार आहे. तर मास्टर एडिशन लूना वाइट, कॉसमॉस ब्लॅक आणि वॉएजर ग्रे कलर ऑप्शन मध्ये येईल. वाचा: दोन्ही स्मार्टफोन १२ जीबी पर्यंत रॅम आणि २५६ जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज सोबत येईल. प्रोसेसर म्हणून GT 5G मध्ये तुम्हाला स्नॅपड्रॅगन ८८८ आणि मास्टर एडिशन मध्ये स्नॅपड्रॅगन 778G चिपसेट पाहायला मिळू शकेल. फोटोग्राफीसाठी कंपनी दोन्ही हँडसेट्स मध्ये एलईडी फ्लॅश सोबत ट्रिपल रियर कॅमेरा ऑफर करणार आहे. या फोनमध्ये ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर सोबत एक ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि एक २ मेगापिक्सलचा मायक्रो सेन्सर मिळेल. सेल्फीसाठी GT 5G मध्ये कंपनी १६ मेगापिक्सलचा आणि मास्टर एडिशन मध्ये ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देईल. कंपनी या फोनमध्ये ६५ वॉटच्या फास्ट चार्जिंग सपोर्ट सोबत GT 5G मध्ये 4500mAh आणि मास्टर एडिशन मध्ये 4300mAh ची बॅटरी ऑफर करते. वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2UnxtL6