नवी दिल्लीः स्मार्टफोन कंपन्या एका पाठोपाठ एक आपल्या स्मार्टफोन्सच्या किंमतीत वाढ करीत आहेत. रियलमीने सुद्धा आपल्या चार स्मार्टफोन्सच्या किंमतीत वाढ केली आहे. 91Mobiles च्या रिपोर्टनुसार, कंपनी ने , , आणि फोन्सच्या किंमतीत वाढ केली आहे. या फोनच्या किंमतीत ५०० रुपयांची वाढ केली आहे. वाढलेल्या किंमती फक्त ऑनलाइन स्टोर्सवर लागू होणार आहेत. रियलमी वेबसाइट आणि फ्लिपकार्ट वर अजूनही याला जुन्याच किंमतीत विकले जात आहे. जाणून घ्या डिटेल्स. वाचा: Realme 8 5G ची नवीन किंमत Realme 8 5G स्मार्टफोनची नवीन किंमत १४ हजार ९९९ रुपयांपासून सुरू होणार आहे. ही किंमत फोनच्या बेस व्हेरियंट ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजची आहे. याआधी या फोनची किंमत १४ हजार ४९९ रुपये होती. याचप्रमाणे ४ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १५ हजार ९९९ रुपये झाली आहे. आधी या फोनची किंमत १५ हजार ४९९ रुपये होती. ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १७ हजार ९९९ रुपये झाली आहे. आधी या फोनची किंमत १७ हजार ४९९ रुपये होती. वाचाः Realme C21 आणि C25s ची नवीन किंमत Realme C21 स्मार्टफोनच्या 3GB रॅम प्लस 32GB स्टोरेजच्या बेस व्हेरियंटची किंमत ८ हजार ९९९ रुपये झाली आहे. या फोनची आधीची किंमत ८ हजार ४९९ रुपये होती. याचप्रमाणे 4GB रॅम प्लस 64GB स्टोरेजच्या बेस व्हेरियंटची किंमत ९ हजार ९९९ रुपये झाली आहे. या फोनची किंमत आधी ९ हजार ४९९ रुपये होती. Realme C25s स्मार्टफोन दोन व्हेरियंट मध्ये येतो. फोनचे बेस व्हेरियंट 4GB रॅम प्लस 64GB स्टोरेजची किंमत १० हजार ९९९ रुपये झाली आहे. जी आधी १० हजार ४९९ रुपये होती. 4GB रॅम प्लस 128GB स्टोरेजच्या व्हेरियंटची किंमत ११ हजार ९९९ रुपये झाली आहे. आधी या फोनची किंमत ११ हजार ४९९ रुपये होती. वाचा: Realme Narzo 30 4G ची नवीन किंमत Realme Narzo 30 4G या लिस्टमधील चौथा फोन आहे. ज्याची किंमत वाढवली आहे. या स्मार्टफोनच्या 4GB रॅम प्लस 64GB स्टोरेजच्या बेस व्हेरियंटची किंमत १२ हजार ९९९ रुपये झाली आहे. जी आधी १२ हजार ४९९ रुपये होती. या फोनच्या 6GB रॅम प्लस 64GB स्टोरेजच्या मिड रेंज व्हेरियंटची किंमत १३ हजार ९९९ रुपये झाली आहे. जी आधी १३ हजार ४९९ रुपये होती. याच प्रमाणे 6GB रॅम प्लस 128GB स्टोरेजच्या फोनची किंमत १४ हजार ९९९ रुपये झाली आहे. ही आधी १४ हजार ९९९ रुपये होती. वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3m91A4d