नवी दिल्लीः Xiaomi कडून एक मोठी चूक झाली आहे. आपला अपकमिंग स्मार्टफोन च्या लाँचिंग आधीच त्याचे स्पेसिफिकेशन पासून डिझाइन पर्यंत सर्व महत्त्वपूर्ण माहिती लीक झाली आहे. Xiaomi ने चुकून आपली वेबसाइट (Caschy’s Blog) वर फोन संबंधित माहिती पोस्ट केली आहे. कंपनीच्या या चुकीमुळे Redmi 10 चे फीचर्स लाँचिंग आधीच समोर आले आहेत. वाचा: Xiamoi ने नंतर या पोस्टला डिलीट केले होते. परंतु, गॅझेट ३६० ने आतापर्यंत या फोनच्या संबंधित सर्व डिटेल्स व्हायरल झाली आहे. शाओमीने चुकून केलेल्या पोस्टच्या माहितीनुसार, फोनला १३ ऑगस्टला लाँच करणार होते. परंतु, कंपनीने १३ ऑगस्टला लाँच केले नाही. आता या फोनला ऑगस्टच्या अखेरच्या आठवड्यात चीनी बाजारात लाँच केले जावू शकते. तुमच्या माहितीसाठी Redmi 10 गेल्या वर्षी लाँच करण्यात आलेला एंट्री लेवल स्मार्टफोन Redmi 9 चे अपग्रेडेड वर्जन आहे. Xiamoi च्या या फोनमध्ये क्वॉड कॅमेरा, पंच होल डिस्प्ले सारखे फीचर्स मिळतील. वाचा: Redmi 10 चे फीचर्स Xiamoi कडून चुकून लीक माहितीनुसार, Redmi 10 मध्ये 90Hz चे रिफ्रेश रेट सोबत ६.५ इंचाचा डिस्प्ले मिळेल. यासोबतच कंपनीकडून 60Hz पॅनेलचे अपग्रेडेड प्रोसेसर सुद्धा दिले जाईल. Redmi 10 Xiamoi च्या अन्य अँड्रॉयड फोन प्रमाणे व्हेरियबल रिफ्रेश रेट टेक्नोलॉजी सपोर्ट करतो. तीन स्टोरेज ऑप्शनमध्ये मिळेल Redmi 10 लीक झालेल्या माहितीनुसार, Redmi 10 तीन स्टोरेज ऑप्शन मध्ये उपल्बध होणार आहे. पहिला 4GB RAM + 64GB स्टोरेज, दुसरा 4GB RAM + 128GB स्टोरेज, तिसरा 6GB RAM + 128GB स्टोरेजमध्ये येईल. या फोनला तीन कलर ऑप्शन सोबत लाँच केले जावू शकते. यात कार्बन ग्रे, पेबल व्हाइट आणि सी ब्लू कलरचा समावेश आहे. वाचाः 50MP चा मिळेल क्वॉड कॅमेरा लीक माहितीनुसार, या फोनमध्ये रियर मध्ये चार कॅमेरे मिळतील. फोनच्या मागे 50MPचा अल्ट्रा वाइड लेन्स कॅमेरा मिळेल. यासोबतच 8MP चा अल्ट्रा वाइड लेन्स कॅमेरा मिळेल. या फोनमध्ये मायक्रो आणि डेप्थ शूट करण्यासाठी 2-2MP सेन्सर कॅमेरा मिळेल. फ्रंट मध्ये 8MP चा सेल्फी कॅमेरा फोन मिळेल. या फोनमध्ये 5000mAh ची मजबूत बॅटरी आणि 18W चे फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळेल. या फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर मिळेल. या फोनची किंमत जवळपास १३ हजार ६०० रुपये असू शकते. वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2VTpfe0