नवी दिल्लीः Realme GT आणि GT मास्टर एडिशन सीरीजचे फोन १८ ऑगस्ट रोज भारतात लाँच करण्यात येणार आहेत. याची माहिती स्वतः कंपनीचे भारतातील प्रमुख माधव सेठ यांनी दिली आहे. यासोबतच त्यांनी सांगितले की, फोनचे फीचर्स ग्लोबल व्हेरियंट सारखे असतील. तर म्हणजेच, रियलमीचा पहिला लॅपटॉप संबंधी विचारले असता सीईओने सांगितले की, नवीन प्रोडक्ट आहे. त्यामुळे लवकरच लाँच होण्याची शक्यता आहे. परंतु, एका लीक झालेल्या माहितीनुसार, कंपनी Realme Book ला १८ ऑगस्ट रोजी Realme GT सोबत भारतात लाँच करण्याची शक्यता आहे. वाचाः CEO ने ट्वीट केले टीज ट्विटरवर पोस्ट करण्यात आलेल्या टीजर इमेज मध्ये रियलमी बुक लॅपटॉप सोबत ब्लू कलर ऑप्शनमध्ये रियलमी जीटी मास्टर एडिशनला पाहिले गेले आहे. ट्विट मध्ये लिहिले आहे की, हे सूटकेस खास येत आहे. यात किती उत्पादनसंबंधी तुम्ही उत्साहित आहात?, Realme प्रमुख ने स्पष्टपणे उल्लेख केला नाही की, रियलमी लॅपटॉप Realme GT फोन सोबत लाँच करणार आहे. परंतु, टीजर हीच हिंट देतोय की, हा लॅपटॉप १८ ऑगस्ट रोजी Realme GT सोबत लाँच केला जावू शकतो. वाचाः Realme Bookचे संभावित फीचर्स आणि किंमत लीक झालेल्या वैशिष्ट्यांनुसार, Realme Book ला १४ इंचाच्या LCD FHD डिस्प्ले सोबत लाँच केले जावू शकते. हे लेटेस्ट 11th generation च्या इंटेल कोर प्रोसेसर द्वारा येवू शकते. हे लॅपटॉप विंडोज ११ ओएस मध्ये अपग्रेड करण्याची शक्यता आहे. रियलमी बुकच्या बेस व्हेरियंटची किंमत ४० हजार रुपयांच्या जवळपास असू शकते. रियलमीचा हा लॅपटॉप १८ तारखेला लाँच झाल्यास या आठवड्यात लाँच झालेल्या RedmiBook लॅपटॉपला टक्कर देण्यात यशस्वी होईल की नाही, हे पाहणे महत्त्वाचे आहे. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/37nfGq7