नवी दिल्ली : भारतीय बाजारात काही दिवसांपूर्वीच या स्मार्टफोनला लाँच करण्यात आले होते. या स्मार्टफोनचा आज पहिला ई-कॉमर्स वेबसाइट वर आयोजन करण्यात आला आहे. सेलमध्ये फोनला कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी आहे. हा फोन ४जीबी/६४जीबी आणि ६जीबी/६४जीबी या दोन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये येतो. पहिल्या सेलमध्ये या फोनवर अनेक ऑफर्स आणि डिस्काउंट्स मिळत आहे. वाचाः Micromax IN 2B ची किंमत आणि ऑफर्स या फोनच्या ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ७,९९९ रुपये आहे. या फोनवर ७,४५० रुपये एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. ऑफरचा पूर्ण लाभ मिळाल्यास फोन फक्त ५४९ रुपयात मिळेल. तर फोनच्या ६ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेजची किंमत ८,९९९ रुपये आहे. मात्र, जुन्या फोनवर ८,४५० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. पूर्ण एक्सचेंज ऑफरचा लाभ मिळाल्यास फोन फक्त ५४९ रुपयात मिळेल. कार्ड ऑफर्सबद्दल सांगायचे तर बँकेच्या डेबिट/क्रेडिट कार्ड आणि आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास १० टक्क्यांपर्यंत सूट मिळेल. स्टँडर्ड ईएमआय अंतर्गत फोनला २७८ रुपये दरमहिना देऊन खरेदी करू शकता. यावर १ वर्षाची वॉरंटी देखील दिली जात आहे. Micromax IN 2B चे फीचर्स हा फोन अँड्राइड ११ वर काम करतो. यामध्ये ६.५२ इंचाचा एचडी+ वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले देण्यात आला असून, याचा आस्पेक्ट रेशियो २०:९ आहे. फोन Unisoc T६१० ऑक्टा-कोर प्रोसेसरसह येतो. स्टोरेजला मायक्रोएसडी कार्डद्वारे २५६ जीबीपर्यंत वाढवू शकता. फोनमध्ये ड्यूर रियर कॅमेरा देण्यात आला आहे. याचा प्रायमरी कॅमेरा १३ मेगापिक्सल, दुसरा २ मेगापिक्सलचा आहे. सेल्फीसाठी ५ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळेल. पॉवरसाठी ५००० एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. कनेक्टिव्हिटीसाठी यात ड्यूल VoWiFi, ड्यूल VoLTE, Wi-Fi ८०२.११ ac, ब्लूटूथ वी५ आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट मिळेल. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3CnKSUs