Full Width(True/False)

एकापेक्षा एक दमदार फीचर्स! Samsung ने लाँच केल्या दोन शानदार स्मार्टवॉच, पाहा किंमत

नवी दिल्ली : Galaxy Unpacked Event मध्ये कंपनीने आपली नवीन लाँच केली आहे. कंपनीने आणि ला सादर केले आहे. ही स्मार्टवॉच नवीन वर काम करते, याला गुगलने सॅमसंगसोबत मिळून तयार केले आहे. या दोन्ही वॉच वॉटर रेसिस्टेंट असून, याला आयपी६८ रेटिंग मिळाले आहे. वॉचमधील नवीन ऑपरेटिंग सिस्टम सॅमसंगच्या लेटेस्ट वन यूआय वॉच कस्टम स्किनसह येते. या दोन्ही वॉचच्या किंमती आणि फीचर्सविषयी सविस्तर जाणून घेऊयात. वाचा: Galaxy Watch 4 Classic Sआणि Samsung Galaxy Watch 4 चे स्पेसिफिकेशन्स डिस्प्ले: दोन्हीही स्मार्टवॉच नवीन Wear OS वर आधारित वन यूआय वॉच ३ वर काम करतात. गॅलेक्सी वॉच ४ मध्ये ४०एमएम आणि गॅलेक्सी वॉच ४ क्लासिक ४२एमएम मध्ये १.२ इंच (३९६x३९६ पिक्सल) एमोलेड डिस्प्ले मिळतो. गॅलेक्सी वॉच ४ ४४एमएम आणि गॅलेक्सी वॉच क्लासिक ४६ एमएम मध्ये १.४ इंच (४५०x४५० पिक्सल) एमोलेड डिस्प्ले आहे. प्रोटेक्शनसाठी यामध्ये गोरिल्ला ग्लास डीएक्सचा वापर करण्यात आला आहे. प्रोसेसर, रॅम व स्टोरेज: सॅमसंगने या वॉचमध्ये Exynos W920 SoC सोबत १.५ जीबी रॅम दिली आहे. सोबतच, १६ जीबी स्टोरेज मिळते. बॅटरी: Galaxy Watch 4 Classic ४२mm आणि Galaxy Watch 4 ४०mm मध्ये २४७mAh बॅटरी, तर Galaxy Watch 4 Classic ४६mm आणि Galaxy Watch 4 ४४mm मध्ये कंपनीने ३६१mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. हेल्थ फीचर्स: दोन्ही वॉचमध्ये कंपनीने बायोएक्टिव्ह सेंसर दिले आहेत, जे ऑप्टिकल हर्ट रेट सेंसर, बायोइलेक्ट्रिकल इम्पीडेंस एनालिसिस सेंसर आणि इलेक्ट्रिकल हर्ट रेट सेंसरशी जोडते. वॉचमध्ये SpO2 ट्रॅकिंग, हर्ट रेट मॉनिटरिंग आणि स्लीप अ‍ॅनालिसिस फीचर्स मिळतात. नवीन स्मार्टवॉचमध्ये इलेक्ट्रोकार्डियोग्राम म्हणजेच ईसीजीचा सपोर्ट देखील मिळेल. मात्र, या दोन्ही वॉच आरोग्याशी संबंधित गोष्टींची माहिती देण्यास मेडिकली अप्रूव्ड नाहीत. दोन्ही वॉचमध्ये फिटनेस अ‍ॅक्टिव्हिटीला ट्रॅक करण्यासाठी अनेक प्रीलोडेड स्पोर्ट्स मोड्स मिळतात. कम्पॅटिबिलिटी: कम्पॅटिबिलिटीबद्दल सांगायचे तर वॉच Android ६.० आणि त्यावरील डिव्हाइसशी कनेक्ट करू शकता. कनेक्टिव्हिटी: कनेक्टिव्हिटीसाठी ड्यूल-बँड वाय-फाय, ४जी एलटीई (पर्यायी), एनएफसी, जीपीएस, ए-जीपीएस, ब्लूटूथ, ग्लोनास, Beidou आणि Galileo सपोर्ट मिळेल. यामध्ये पे आणि गुगल पे सर्व्हिस देखील वापरू शकता. याशिवाय एसएमएस, ईमेल आणि कॉलचे नॉटिफिकेशन देखील मिळतील. Samsung Galaxy Watch 4 ची किंमत या स्मार्टवॉचची सुरुवाती किंमत २४९,९९ डॉलर्स (जवळपास १८,६०० रुपये) आहे. ही किंमत ब्लूटूथ व्हेरिएंटची आहे. तर एलटीई व्हेरिएंटची किंमत २९९.९९ डॉलर्स (जवळपास २२,३०० रुपये) पासून सुरू होते. Galaxy Watch 4 ४०mm ला सिल्वर, ब्लॅक आणि पिंक गोल्ड रंगात सादर केले आहे. तर Galaxy Watch 4 ४४mm व्हेरिएंटला सिल्वर, ब्लॅक आणि ग्रीन शेडमध्ये सादर केले आहे. वॉच अ‍ॅल्युमिनियम बिल्ड आहे. Samsung Galaxy Watch 4 Classic ची किंमत या स्मार्टवॉचच्या ब्लूटूथ व्हेरिएंटची सुरुवाती किंमत ३४९.९९ डॉलर्स (जवळपास २६,००० रुपये) आहे. तर एलटीई व्हेरिएंटची किंमत ३९९.९९ डॉलर्स (जवळपास २९,७०० रुपये) आहे. Galaxy Watch 4 Classic ४२mm आणि Galaxy Watch 4 Classic ४६mm ला सिल्वर आणि ब्लॅक शेडमध्ये सादर करण्यात आले आहे. वॉचला स्टेनलेस स्टील बॉडीसोबत सादर करण्यात आले आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/37PZiip