Full Width(True/False)

Whatsapp वर ग्रुप न करता २५६ लोकांना एकाचवेळी पाठवता येवू शकतो मेसेज, जाणून घ्या खास ट्रिक

नवी दिल्लीः WhatsApp Tips And Tricks: सर्वात पॉप्युलर मेसेजिंग अॅप म्हटले की, व्हॉट्सअॅपचे नाव सर्वात पहिले येते. या अॅप मध्ये चॅट, ऑडियो कॉल आणि व्हिडिओ कॉल सुद्धा करू शकता. व्हॉट्सअॅपला आणखी मजेदार करण्यासाठी युजर्स याचे टिप्स आणि ट्रिक्स शोधत असतात. व्हॉट्सअॅपवर युजर ग्रुप मध्ये एक मेसेज करा. तो ग्रुपमध्ये लोकांपर्यंत पोहोचतो. या ग्रुपमध्ये जास्तीत जास्त २५६ लोकांना अॅड करता येवू शकते. परंतु, जर तुम्हाला २५६ लोकांना कोणत्याही ग्रुपविना मेसेज पाठवायचा असेल तर, आज आम्ही तुम्हाला अशाच एका ट्रिक बद्दल माहिती सांगणार आहोत. त्यामुळे तुम्ही ग्रुप न बनवता २५६ लोकांना एकाचवेळी मेसेज पाठवू शकता. जाणून घ्या. वाचाः या स्टेप्सला करा फॉलो >> सर्वात आधी तुम्ही आपल्या व्हॉट्सअॅपला ओपन करा. त्यानंतर वरच्या तीन डॉट्सवर क्लिक करा. >> त्यानंतर तुम्हाला New Broadcast ऑप्शन वर क्लिक करावे लागेल. >> क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर कॉन्टॅक्ट लिस्ट येईल. आता तुम्हाला जे लोक हवी असतील त्यांना तुम्ही अॅड करू शकता. >> सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला खाली हिरवी टिक दिसेल. त्यावर क्लिक करा. त्यानंतर तुमची लिस्ट तयार होईल. >> यानंतर तुम्ही ब्रॉडकास्टला ओपन करून 'Hi' लिहिले तरी तो मेसेज सर्व लोकांना पोहोचेल. ज्याला तुम्ही अॅड केले आहे. >> तुम्ही या ब्रॉडकास्टला नाव सुद्धा देवू शकता. तुम्ही ब्रॉडकास्ट लिस्ट बनवू शकता. अनेक लोक मित्रांसाठी आणि फॅमिली साठी वेगळी लिस्ट बनवतात. तुम्ही सुद्धा असेच करू शकता. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3xChhmF