Full Width(True/False)

Smartwatch Tips: स्मार्टवॉच खरेदी करताना या फीचर्सला करा चेक, फायद्यात राहाल

नवी दिल्लीः Tips: देशात हळूहळू लोक आता टेक्नोलॉजी गॅझेट्सला खरेदी करू लागले आहेत. सध्या स्मार्टफोन शिवाय, स्मार्टवॉचचे मार्केट वाढले आहे. तरुणांपासून वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत अनेक जण स्मार्टवॉच खरेदी करीत आहेत. अनेक कंपन्या वेगवेगळ्या फीचर्स सोबत स्मार्टवॉच लाँच करीत आहेत. ज्यात हेल्थ मॉनिटर करू शकता. जर तुम्हाला नवीन स्मार्टवॉच खरेदी करायची असेल तर तुम्हाला या गोष्टी आधीच माहिती हव्यात. कमी किंमतीत जबरदस्त फीचर्सची स्मार्टवॉचवर एक नजर टाका, जाणून घ्या डिटेल्स. वाचा: अडवॉन्स्ड फीचर्स जरूर चेक करा सध्या स्मार्टवॉच अनेक जबरदस्त फीचर्स सोबत मिळत आहेत. यात तुम्ही हार्ट रेट, ब्लड प्रेशर आणि आपली डेली अॅक्टिवेटला मॉनिटर करू शकता. यासोबतच झोपताना आपली स्लिपिंग सायकलला मॉनिटर करू शकता. त्यामुळे स्मार्टवॉच खरेदी करताना अडवॉन्स्ड फीचर्स संबंधी सर्व माहिती जाणून घ्या. वाचा: स्मार्टफोनला कनेक्ट व्हायला हवी चांगली स्मार्टवॉच तुमच्या स्मार्टफोनला कनेक्ट होते. तुम्ही याद्वारे कॉल आणि मेसेज कंट्रोल करू शकता. याशिवाय, तुम्ही म्यूझिकला सुद्धा कंट्रोल करू शकता. जर तुमचे बजेट चांगले असेल तर तुम्ही जबरदस्त फीचर्सची स्मार्टवॉच खरेदी करू शकता. वाचा: वॉटरप्रूफ स्मार्टवॉच जबरदस्त अनेकदा स्मार्टवॉच घातलेली असताना आपण स्विमिंग पूल मध्ये उडी घेतो. त्यामुळे स्मार्टवॉच खराब होण्याची भीती असते. त्यामुळे वॉटरप्रूफ स्मार्टवॉच खरेदी केल्यास तुम्हाला पाण्यापासून भीती राहत नाही. तुम्ही बिंधास्त पाण्यात उडी मारू शकता. तसेच उन्हाळ्यात आलेल्या घामाने स्मार्टवॉच खराब होत नाही. वाचाः दिवस-रात्र वापर धोकादायक अनेक लोक दिवस रात्र स्मार्टवॉच घालतात. असे करणे तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक असते. स्मार्टवॉच मधून येत असलेले इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन डोकेदुखीचे कारण बनते. याशिवाय, वारंवार स्मार्टवॉचला पाहायला नाही पाहिजे. यामुळे तुम्ही तुमचा फोकस कामावर करू शकत नाही. स्मार्टवॉचचा एका मर्यादेत वापर करायला हवा. वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3jN9UnC