Full Width(True/False)

२५ तासांच्या बॅटरी लाईफसह Soundcore R100 TWS Earbuds लाँच, किंमत बजेटमध्येच, पाहा डिटेल्स

नवी दिल्ली: Soundcore ने ग्राहकांसाठी अत्यंत किफायतशीर किंमतीत प्रभावी वैशिष्ट्यांसह आपले नवीन ट्रू-वायरलेस लाँच केले आहेत. बजेट-अनुकूल साउंडकोर इअरबड्समध्ये, ग्राहकांना दोन Listening Modes मिळतील, एक नॉर्मल , तर दुसरा बेस. या व्यतिरिक्त, बड्स समर्थन आणि चांगली बॅटरी लाईफ देतात. २००० रुपयांपेक्षा कमी किंमतीत येणाऱ्या या बड्समध्ये तुम्हाला अॅक्टिव्ह नॉईज कॅन्सलेशन फीचरचा सपोर्ट मात्र मिळणार नाही. वाचा: Soundcore R100 Earbuds: वैशिष्ट्ये हे बेसअप टेक्नॉलॉजीसह १० मिमी ग्राफिन ड्रायव्हर्ससह येतात. बॅटरी बॅकअप बद्दल असा दावा केला गेला आहे की, इयरबड्स एकाच चार्जवर ६.५ तास बॅटरी आयुष्य प्रदान करतात, तर चार्जिंग केससह एकूण २५ तास बॅटरी लाईफ उपलब्ध आहे. इयरबड्स जलद चार्जिंगला समर्थन देतात आणि फक्त ५ मिनिटांच्या चार्जवर २ तासांचा प्लेटाईम देतात. कनेक्टिव्हिटीसाठी यात ब्लूटूथ आवृत्ती ५ आणि एएसी, एसबीसी कोडेक सपोर्ट व्यतिरिक्त, दोन ऐकण्याचे मोड प्रदान केले गेले आहेत, बेस मोड आणि नॉर्मल मोड. चार्जिंग केसमध्ये ५०० mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी चार्ज होण्यास १.५ तास लागतात. चार्जिंग केसमध्ये चार्जिंगसाठी यूएसबी टाइप-सी पोर्ट आहे आणि एक एलईडी इंडिकेटर देखील आहे जे चार्जिंग स्थिती दर्शवते. Soundcore R100 Earbuds स्टिरिओ मोडसह येतात, या मोडच्या मदतीने, युजर्स इच्छित असल्यास एकाच इयरबडमध्ये संगीत ऐकू शकतात. TWS इयरबड्समध्ये पाणी प्रतिरोधक साठी IPX5 रेटिंग आहे. Soundcore R100 Earbuds भारतातील किंमत युजर्स हे बड्स पांढऱ्या आणि काळ्या अशा दोन रंगात खरेदी करू शकतात. या इयरबड्सची किंमत १९९९ रुपये आहे. हे TWS इयरबड्स फ्लिपकार्ट वरून तुम्हाला खरेदी करता येतील. यासह काही बँक ऑफर देखील देण्यात येत आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3Af3c0b