Full Width(True/False)

Vivo Y33s स्मार्टफोनची आज होणार भारतात एंट्री, मिळेल ८GBरॅम आणि ५०००mAh बॅटरी

नवी दिल्ली : भारतीय बाजारात आज Y33s लाँच होणार आहे. या फोनच्या फीचर्सचा खुलासा झाला होता. आज अखेर भारतीय बाजारात या फोनची एंट्री होणार आहे. रिपोर्टनुसार, या फोनला ई-कॉमर्स वेबसाइट वर लिस्ट करण्यात आले होते. मात्र, नंतर हटवण्यात आले. च्या मुख्य फीचर्सबद्दल सांगायचे तर यामध्ये ६.५८ इंच फुल एचडी प्लस डिस्प्ले, मीडियाटेक हीलियो जी८० प्रोसेसर देण्यात आला आहे. यामध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. याचा मुख्य प्राइमरी सेंसर ५० मेगापिक्सलचा असेल. वाचा: Vivo Y33s ची संभाव्य किंमत: या फोनच्या ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १७,९९० रुपये आहे. फोनला मिडडे ड्रीम कलरमध्ये लाँच करण्यात आले आहे. वेगवेगळ्या रिपोर्टमध्ये याचा खुलासा झाला असून, लाँचिंग नंतरच फोनची अधिकृत किंमत कळेल. Vivo Y33s चे फीचर्स: हा फोन अँड्राइड ११ आधारित Funtouch OS ११.१ वर काम करेल. यामध्ये ६.५८ इंच फुल एचडी हॅलो फुलव्ह्यू डिस्प्ले मिळण्याची शक्यता असून, याचे पिक्सल रिझॉल्यूशन २४०८x१०८० असू शकते. यात ऑक्टा-कोर मीडियाटेक हेलियो जी८० प्रोसेसर मिळण्याची शक्यता आहे. फोन ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज मिळेल. यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाण्याची शक्यता असून, यात ५० मेगापिक्सल प्राइमरी, २ मेगापिक्सल बोकेह सेंसर आणि तिसरा मॅक्रो सेंसर असेल. सेल्फीसाठी १६ मेगापिक्सलचा सेंसर मिळेल. विवोच्या या फोनमध्ये पॉवरसाठी ५००० एमएएचची बॅटरी मिळेल, जी १८ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह येईल. कनेक्टिव्हिटीसाठी यात ४जी LTE, ड्यूल बँड वाय-फाय, ब्लूटूथ व्हर्जन ५ आणि यूएसबी ओटीजी सारखे फीचर्स मिळतील. फोनमध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर मिळेल. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3j6YyLT