Full Width(True/False)

भारतीयांच्या भेटीला लवकरच येतोय Vivo Y53s, मिळू शकतो ६४ MP कॅमेरा , पाहा डिटेल्स

नवी दिल्ली : हँडसेट निर्माता Vivo आपला नवीन स्मार्टफोन भारतात ग्राहकांसाठी लाँच करणार आहे. हा आगामी Vivo मोबाईल फोन ९ ऑगस्ट रोजी ग्राहकांच्या भेटीला येईल. हा हँडसेट गेल्या महिन्यात व्हिएतनाम मध्ये ६४ मेगापिक्सल ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप सह लाँच झाला होता. या Vivo फोनचे 5G वेरिएंट देखील आणण्यात आले होते. परंतु, व्हेरिएंट सध्या भारतात लाँच होण्याची चिन्हे नाही. आधी सांगितल्याप्रमाणे फोन व्हिएतनाम मध्ये लाँच झाला आहे, त्यामुळे फोनच्या स्पेसिफिकेशन बद्दल बरीच माहिती उपलब्ध आहे. वाचा: Vivo Y53s वैशिष्ट्ये सॉफ्टवेअर: हा अँड्रॉइड ११ वर आधारित फनटच ओएस ११.१ वर काम करतो. डिस्प्ले: फोनमध्ये ६.५८ इंच फुल-एचडी + (१०८०x२४०० पिक्सेल) डिस्प्ले ६०Hz रिफ्रेश रेट आहे आणि त्याचा आस्पेक्ट रेशो २०: ९ आहे. कॅमेरा: मागील पॅनेलवर ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप, ६४ एमपी प्रायमर कॅमेरा, २ एमपी मॅक्रो कॅमेरा आणि २ एमपी डेप्थ कॅमेरा आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी १६ एमपीचा फ्रंट कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. प्रोसेसर, रॅम आणि स्टोरेज: Vivo मोबाईल फोनमध्ये मीडियाटेक हेलियो जी ८० एसओसीसह ८ जीबी रॅम / १२८ जीबी स्टोरेज आहे. जे मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने स्टोरेज वाढवता येते. बॅटरी: फोनमध्ये ५००० mAh ची बॅटरी आहे.जी, ३३ W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कनेक्टिव्हिटी: फोनमध्ये जीपीएस, ड्युअल-बँड वाय-फाय, ४ जी एलटीई, यूएसबी टाइप-सी पोर्ट आणि ब्लूटूथ आवृत्ती ५ सारखी वैशिष्ट्ये समाविष्ट आहेत. सुरक्षेसाठी साइड फिंगरप्रिंट सेन्सर आहे. Vivo Y53s ची भारतातील किंमत (अपेक्षित) आतापर्यंत उघड झालेल्या अहवालात असे सूचित करण्यात आले आहे की, भारतात या Vivo फोनच्या ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी व्हेरिएंटची किंमत २२,९९० रुपये (सुमारे १९,४९० रुपये एमओपी) असेल. अधिकृत किंमतीची माहिती अद्याप उघड झाली नाही. फोनचे दोन व्हेरिएंट आहेत, डीप सी ब्लू आणि फॅन्टास्टिक रेनबो. Vivo Y53s चे ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंट ६,९९०,०००VND (अंदाजे २२,५०० रुपये) मध्ये व्हिएतनाममध्ये लाँच केले गेले आहे . वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3jusMYt