नवी दिल्ली: दूरसंचार कंपनी रिलायन्स Jio ने काही काळापूर्वी वर मोबाईल रिचार्जची सुविधा अधिक सहज करण्यासाठी नवीन सेवा सुरू केली. असून तिथे युजर्स नवीन रिचार्ज करणे किंवा सिम पोर्ट मिळवणे यासारख्या अनेक गोष्टी सहज करू शकतात. व्हॉट्सअॅपच्या या फीचरमध्ये JioFibre आणि JioMart Payments सारख्या सेवांचाही समावेश आहे. सध्या ही सेवा फक्त इंग्रजी आणि हिंदी या दोन भाषांमध्ये उपलब्ध आहे. पण, कंपनी या सेवेत इतर भाषा जोडण्यावर देखील काम करत आहे. ही सेवा युजर्सना मोबिलिटी, फायबर आणि जिओमार्ट खात्यांमध्ये प्रवेश देते. आता केवळ कॉल, मेसेज, Files शेअरिंगच नाही तर, व्हॉट्सअॅपद्वारे रिचार्जही येणार आहे. वाचा: WhatsApp द्वारे :
- जर तुम्हाला नंबर सेव्ह न करता JioCare सोबत चॅट करायचे असेल तर आधी https://ift.tt/3ANGT2a वर क्लिक करावे लागेल.
- इथं तुम्हाला व्हॉट्सअॅप वेबसाठी परवानगी मागण्यात येईल आणि मग तुम्ही अनेक वैशिष्ट्यांचा लाभ घेऊ शकता.
- याशिवाय, तुम्ही नंबर सेव्ह करून चॅट देखील करू शकता. यासाठी तुम्हाला ७०००७७७००७ वर चॅट करावे लागेल.
- हे JioCare च्या नावाने नोंदणीकृत आहे. यावर तुम्हाला 'हाय' असा मेसेज करावा लागेल. यानंतर तुम्हाला अनेक पर्याय दिले जातील, त्यापैकी एक जिओ सिम रिचार्ज मोड असेल.
- आपल्याला या पर्यायावर क्लिक करावे लागेल. यानंतर, जेव्हा तुम्ही रिचार्ज पर्यायावर क्लिक करता, तेव्हा तुम्हाला जिओचे प्रीपेड प्लॅन दिसतील.
- प्लान्स निवडल्यानंतर तुम्हाला अधिकृत वेबसाईट पेमेंटसवर नेण्यात येईल.
- त्यानंतर तुम्ही कोणत्याही ई-वॉलेटवरून तुमचा नंबर रिचार्ज करू शकता.
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3CRHpxB