नवी दिल्लीः इंस्टेंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपने नुकतेच आपल्या प्लॅटफॉर्मवर काही नवीन फीचर्स जोडले आहेत. या फीचर्सद्वारे केवळ चॅटिंगचा अंदाज बदलणार नाही तर हे आधीच्या तुलनेत जास्त सिक्योर आणि सोपे होईल. याचे खास वैशिष्ट्ये म्हणजे या फीचर्सची मजा अँड्रॉयड आणि iOS या दोन्ही फोनवर घेतली जावू शकते. जाणून घ्या या नवीन तीन फीचर्स संबंधी. वाचा: १. View Once व्हॉट्सअॅपने नुकतेच स्नॅपचॅटप्रमाणे View Once फीचर आणले आहे. या फीचर द्वारे पाठवण्यात आलेले फोटो आणि व्हिडिओ एकदा पाहिल्यानंतर आपोआप गायब होणार आहेत. चॅटहून गायब झाल्यानंतर View Once फीचर मध्ये पाठवण्यात आलेले व्हिडिओ किंवा फोटो फोनच्या गॅलरीत सेव्ह होणार नाही. नवीन फीचर सर्व युजर्संसाठी जारी करण्यात आले आहे. फाइलला समोरच्या व्यक्तीने पाहिल्यानंतर हे गायब होईल. फाइलच्या जागी त्या ठिकाणी फक्त Opened लिहिलेले दिसेल. वाचा: २. Joinable calls व्हॉट्सअॅपने हे फीचर जुलै मध्ये आणले होते. या फीचर द्वारे व्हॉट्सअॅप युजर्स कोणत्याही ग्रुप व्हिडिओ किंवा व्हाइस कॉलला सूटल्यानंतर सुद्धा ज्वॉइन करू शकते. युजर्संना ग्रुप कॉलला मध्येच सोडून जाता येते. किंवा पुन्हा जोडले जावू शकता येते. यासाठी कॉल सुरू असणे आवश्यक आहे. या फीचरच्या येण्याआधी जर तुमच्याकडून कोणाचा व्हॉट्सअॅप ग्रुप कॉल मिस झाला तर त्यात तुम्ही तुमच्या मर्जीप्रमाणे जोडले जावू शकत नव्हते. वाचा: ३. Android आणि iOs वर चॅट ट्रान्सफर व्हॉट्सअॅपवर चॅट ट्रान्सफर करण्यासाठी एक नवीन सुविधा आणली गेली आहे. नवीन फीचर अंतर्गत आता तुम्ही अँड्रॉयड वरून iOS किंवा iOS वरून अँड्रॉयड फोन्सवर सहज व्हॉट्सअॅप चॅट ट्रान्सफर करू शकाल. म्हणजेच जर तुम्ही आपला फोन बदलत असाल तर आता व्हॉट्सअॅप चॅटची जास्त चिंता करण्याची गरज नाही. हे आतापर्यंत अँड्रॉयड वरून आयफोन वर अधिकृतपणे चॅट ट्रान्सफर करण्याची कोणतीही पद्धत नव्हती. वाचा: वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2Xxma4b