नवी दिल्ली: WhatsAppहे युजर्सकडून सर्वाधिक वापरले जाणारे App आहे. WhatsApp चा वापर करत नाही असे क्वचितच असतील. तुम्ही सुद्धा तुमचा बहुतेक वेळ व्हॉट्सअॅपवर घालवत असालच. हेच चॅट्स त्यातीलWhatsApp Chats फॉन्ट स्टाईल वापरून अधिक मजेशीर करतात येतात. फॉन्ट शैली आणि अॅप बॅकग्राउंडमध्ये थोडासा बदल करून व्हॉट्सअॅपचे स्वरूप अधिक मनोरंजक बनवता येतात. तुम्ही मजकूराला इटालिक स्टाईलमध्ये सुद्धा बदलू शकता. ते बोल्ड बनवू शकता आणि त्यांच्या मजकुरावर हायलाइट होण्यासाठी स्ट्राईकथ्रू वापरू शकता. वाचा: व्हॉट्सअॅपमध्ये इटॅलिक टेक्स्ट कसे करावे ? तुमचा मेसेज इटॅलिक करण्यासाठी तुम्हाला टेक्स्टच्या दोन्ही बाजूला अंडरस्कोर वापरावा लागेल, _ text _ व्हॉट्सअॅपमध्ये मजकूर कसा बोल्ड करावा ? मजकूर बोल्ड दिसण्यासाठी तुम्हाला मजकुराच्या दोन्ही बाजूंना स्टार्स वापरावे लागतील, *Text * व्हॉट्सअॅपमध्ये मजकूर कसा करावा ? आपल्या मेसेजला स्ट्राइकथ्रू करण्यासाठी, आपल्याला मजकुराच्या दोन्ही बाजूंना असे टिल्ड घालणे आवश्यक आहे. "Text" युजर्स कोणत्याही विशिष्ट चॅटसाठी कस्टमाईज वॉलपेपर देखील सेट करू शकतात. यासाठी काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील . WhatsApp मध्ये कस्टम वॉलपेपर कसे सेट करावे ?
- व्हॉट्सअॅप उघडा.चॅट्स किंवा संपर्क नावावर जा जिथे तुम्हाला कस्टम बॅकग्राउंड सेट करायचा आहे.
- उजव्या बाजूला असलेल्या तीन डॉट्सवर क्लिक करा. यानंतर वॉलपेपर निवडा.
- युजर्स ब्राइट, डार्क, सॉलिड रंग आणि माय फोटो या पर्यायावर जाऊन वॉलपेपर निवडू शकतात.
- आता विशिष्ट चॅटसाठी तुमचे आवडते वॉलपेपर निवडा. वॉलपेपर सेट करताना दोन पर्याय दिसतील.
- प्रथम- या चॅट्ससाठी आणि दुसरे- हलके थीममधील सर्व चॅट्स (कस्टमाईज थीम असलेल्या गप्पा वगळता).
- पसंतीचा पर्याय निवडा. ओके निवडा. मग वॉलपेपर सेट करा.
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3mqNPON