Full Width(True/False)

गुगलचा हा स्मार्टफोन तात्काळ फुल चार्ज होणार, कॅमेराही दमदार मिळणार, पाहा फीचर्स

नवी दिल्लीः गुगल खूप आधीपासून आपला स्मार्टफोन लाँच करीत आहे. लोकांची सुद्धा या फोनला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या आठवड्यात गुगलने पिक्सेल ५ए स्मार्टफोनची घोषणा केली आहे. गुगलची पिक्सेल डिव्हाइस संबंधी आता माहिती समोर येत आहे. टेन्सर नावाच्या एका कस्टम चिपसेट सोबत येणाऱ्या या फोनची कोणती माहिती समोर येत आहे, जाणून घ्या. वाचा: चार्जिंग मध्ये असतील हे धमाकेदार अपग्रेड ९१ मोबाइल्सच्या एका टिप्स्टर योगेश ब्रारच्या म्हणण्यानुसार, गुगलचा पिक्सेल ६ आणि पिक्सेल ६ प्रो या दोन्ही डिव्हाइसेजची चार्जिंग आता खूप वेगवान होणार आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, गुगलचे हेड ऑफिस मध्ये 33W ची चार्जिंग ब्रिक्सचा वापर केलेला पाहायला मिळतो. यावरून अंदाज लावला जात आहे की, हे ब्रिक्स या पिक्सेल ६ स्मार्टफोन्ससाठी असू शकतो. यावेळी पिक्सेलचा जो स्मार्टफोन आहे. त्या ग्राहकांना केवळ 18W ची चार्जिंगची सुविधा देते. सोबत हेही समोर आले आहे की, पिक्सेल ६ सोबत ग्राहकांना चार्जर मिळणार आहे. वाचा: कमालीचा फोटो काढण्याची सुविधा ज्या पिक्सल फोन्सचा वापर केला जात आहे त्यात लोकांना या फोनमध्ये कॅमेरा आणखी चांगला बेस्ट मिळू शकतो. पिक्सेल ६ च्या दोन्ही फोन्सचा कॅमेरा जुन्या मॉडल्सच्या तुलनेत अधिक चांगला आहे. यात GN1 50MP चा सेन्सर असेल आणि 12MP चा अल्ट्रा-वाइड कॅमेरा आहे. पिक्सेल ६ प्रो मध्ये 48MP सेन्सरचा टेलीफोटो कॅमेरा आणि 4X चा ऑप्टिकल जूम असेल. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3y506KR