Full Width(True/False)

WhatsApp चे बहुप्रतिक्षित View Once फीचर लाँच, ‘या’ यूजर्सला करता येणार वापर

नवी दिल्ली : इंस्टंट WhatsApp ने अखेर नवीन view once जारी केले आहे. या फीचरमुळे फोटो आणि व्हिडीओ एकदा पाहिल्यानंतर आपोआप डिलीट होतील. हे फीचर सध्या युजर्ससाठी उपलब्ध करण्यात आले आहे. यूजर्सला अ‍ॅप स्टोरवर जाऊन व्हॉट्सअ‍ॅपचे नवीन व्हर्जन डाउनलोड करावे लागेल. अँड्राइड यूजर्ससाठी हे फीचर कधी उपलब्ध होईल याची माहिती देण्यात आलेली नाही. वाचाः ने म्हटले आहे की व्ह्यू वन्स फीचरचे टेस्टिंग अनेक दिवसांपासून सुरू होते. आता आयफोन यूजर्ससाठी फीचर रिलीज करण्यात आले आहे. व्ह्यू वन्स फीचर एक्टिव्ह झाल्यानंतर फोटो-व्हिडीओ एकदा पाहिल्यावर आपोआप डिलीट होतील. हे फोटो-व्हिडीओ फोनच्या मीडिया फाइलमध्ये देखील दिसणार नाही. परंतु, यूजर स्क्रीनशॉट काढू शकतात. अनेक दिवसांपासून सुरू होते टेस्टिंग सप्टेंबर २०२० पासून व्हॉट्सअ‍ॅपच्या या फीचरचे टेस्टिंग सुरू होते. हे फीचर अँड्राइड आणि आयओएस बीटा व्हर्जनवर उपलब्ध करण्यात आले होते. लवकरच हे फीचर सर्व यूजर्ससाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. दरम्यान, WhatsApp ने काही दिवसांपूर्वी यूजर्ससाठी Mute Video फीचर देखील लाँच केले होते. या फीचरद्वारे यूजर्स व्हिडीओ पाठवताना म्यूट करू शकतील. म्हणजे समोरील यूजर्सला व्हिडीओतील आवाज येणार नाही. असा करा म्यूट व्हिडीओ फीचरचा वापर
  • यासाठी सर्वात प्रथम ज्या व्यक्तीला व्हिडीओ पाठवायचा आहे त्याच्या चॅट बॉक्सवर जा.
  • येथे मेसेज बॉक्सवर क्लिक करून जो व्हिडीओ पाठवायचा आहे तो निवडा.
  • व्हिडीओवर क्लिक केल्यानंतर डाव्या बाजूला वरती स्पीकर आयकॉन दिसेल, त्यावर टॅप करा.
  • हे केल्यानंतर व्हिडीओचा आवाज बंद होईल.
वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/37iNSTP