Full Width(True/False)

Apple ला टक्कर देणारा Realme चा पहिला अँड्रॉयड वायरलेस मॅग्नेटिक चार्जर, पाहा खास फीचर्स

नवी दिल्लीः Realme ने मॅग्नेटिक वायरलेस चार्जिंग टेक्नोलॉजीला लाँच केले आहे. हे अॅप्पलच्या मॅगसेफ चार्जिंग सारखे आहे. परंतु, पहिल्यांदा अँड्रॉयड स्मार्टफोन निर्माता पद्धतीने सिस्टम दिली आहे. कंपनीने MagDart वायरलेस चार्जिंग सॉल्यूशनला दोन व्हेरियंट मध्ये लाँच केले आहे. ज्यात बॉक्सी डिझाइन दिली आहे. दुसरे अॅपलचे मॅगेसेफ सारखे गोल शेपमध्ये आहे. हे दोन्ही डिव्हाइस चुंबकीय रुपाने फोनच्या मागच्या बाजुला जोडले जाते. MagDart वायरलेस चार्जिंग सॉल्यूशन मध्ये एक 50W मॅग्नेटिक वायरलेस चार्जरचा समावेश आहे. यावरून कंपनीने दावा केला आहे की, जगातील सर्वात वेगवाग वायरलेस चार्जर आहे. वाचाः Realme Flash फोनही झाला लाँच या चार्जिंग सिस्टम सोबत रियलमीने Realme Flash कॉन्सेप्ट फोनला लाँच केले आहे. जे कंपनीच्या माहितीनुसार, मॅगडार्ट चार्जिंग टेक्नोलॉजीसाठी डिझाइन केले आहे. यात 4,500mAh ड्युअल सेल बॅटरी दिली आहे. MagDart चार्जर एक तासांहून कमी वेळात बॅटरीला शून्य ते १०० टक्के पूर्णपणे चार्ज करते. वाचाः Realme MagDart वायरलेस चार्जिंग टेक्नोलॉजी काय आहे Realme MagDart वायरलेस चार्जिंग टेक्नोलॉजी मध्ये 50W चार्जिंग स्पीडला सपोर्ट करते. हे बोरॉन आणि कोबाल्ट मॅग्नेटचा उपयोग करते. Realme MagDart मध्ये एक्स्ट्रा लार्ज आणि कमी प्रतिबाधाची कॉपर कॉइलचा यूज केला आहे. त्यामुळे चार्जिंग करताना गरम होत नाही. वाचाः MagDart एक्सेसरीज पोर्ट्रेट फोटोग्राफीसाठी मॅग्नडार्ट ब्यूटी लाइटला मॅगडार्टच्या रुपाने फोनशी जोडले जावू शकते. सेल्फीसाठी यात अतिरिक्त फ्लॅशलाइट देते. स्मार्टफोन रिव्हर्स चार्जिंग माध्यमातून चालवले जावू शकते. कंपनीचे हे रिव्हर्स वायरलेस चार्जिंगसाठी पॉवर खेचते. यासोबतच MagDart वॉलेट, ज्यात तीन स्टँडर्ड क्रेडिट कार्ड असू शकते. चित्रपट पाहण्यासाठी किंवा व्हिडिओ कॉल दरम्यान फोनला पकडण्यासाठी किकस्टँड रुपाने सुद्धा काम करते. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2Vl9tsu