Full Width(True/False)

WhatsApp वर जबरदस्त ट्रिक, कोणताही नवा पत्ता शोधा, कोणालाही ट्रॅक करू शकता

नवी दिल्लीः इंस्टेंट मेसेजिंग अॅप WhatsApp आजच्या घडीला सर्वात जास्त वापरले जाणारे मेसेजिंग अॅप आहे. व्हॉट्सअॅपमध्ये भरमसाठ फीचर्स दिले आहेत. अनेकांना या फीचर्स बद्दल पूर्ण माहिती नसते. व्हॉट्सअॅपमधील एका फीचरच्या मदतीने तुम्ही नवीन पत्ता शोधू शकता, या फीचरचा वापर करून तुम्ही कोणत्याही फ्रेंडला किंवा फॅमिली मेंबरला आपले लोकेशन पाठवू शकता. हे फीचर महिलांच्या सुरक्षेसाठी सुद्धा चांगले आहे. जाणून घ्या डिटेल्स. वाचाः लोकेशन शेयर करण्यासाठी या टिप्स वापरा >> यासाठी सर्वात आधी आपले WhatsApp ओपन करा. >> आता चॅट ऑप्शन करा. >> आता ज्याला आपले लोकेशन पाठवायचे आहे त्याचे नाव सिलेक्ट करा. त्यासोबतची चॅट ओपन करा. >> या ठिकाणी WhatsApp Chat मध्ये खालच्या बाजुला ‘+’ किंवा क्लिप आयकॉन दिसेल त्यावर क्लिक करा. >> या ठिकाणी आता Location ऑप्शनला सिलेक्ट करा. >> या ठिकाणी तुम्हाला Send Your Current Location आणि Share Live Location दोन options दिसतील. >> तुम्ही तुमच्या हिशोबाप्रमाणे कोणतेही एक ऑप्शन सिलेक्ट करून पाठवू शकता. >> लोकेशन सिलेक्ट केल्यानंतर सेंड वर क्लिक करा. वाचाः लोकेशन शेयर करताना या गोष्टी लक्षात ठेवा व्हॉट्सअॅपवर जर कोणाला आपले करंट लोकेशन पाठवायचे असेल तर ती तुमचे लोकेशन असेल ज्या ठिकाणी तुम्ही सध्या आहात. तुम्ही जर Live location पाठवत असाल तर तुम्ही जात असलेले ही लोकेशन असेल. याचाच अर्थ लाइव्ह लोकेशन फिक्स नाही. तर करंट लोकेशन फिक्स लोकेशन आहे. लाइव्ह लोकेशनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला दिसेल की, तुम्ही १५ मिनिटासाठी लाइव्ह लोकेशन पाठवत असाल किंवा एक तासांपर्यंत किंवा ८ तासासाठी. तुम्ही तुमच्या गरजेनुसार टाइम सिलेक्ट करा आणि पाठवा. जर तुम्ही लाइव्ह लोकेशन शेयरिंगला बंद करायचे असेल तर तुम्ही लाइव्ह लोकेशन शेयर वर जावू स्टॉप बटनवर क्लिक करा. वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3stbcZ3