नवी दिल्ली : काही वर्षांपूर्वी लोक फोटो काढण्यासाठी सर्वसाधारणपणे डिजिटल कॅमेरा, डीएसएलआरचा उपयोग करत असे. मात्र, आता स्मार्टफोन्समध्ये शानदार कॅमेरे मिळत असल्याने या गोष्टींची गरज भासत नाही. याच कारणामुळे मोबाइल फोटोग्राफीचे प्रमाण वाढले आहे. आज आहे. या निमित्ताने मोबाइलमध्ये फोटो काढताना कोणती काळजी घ्यायला हवी, जेणेकरून तुमचे फोटो सुंदर येतील याबाबत जाणून घेऊया. वाचा: हात स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करा अनेक फोटो काढताना हात थरथरतात. यामुळे फोटो खराब येतो. फोटो काढताना नेहमी हात स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करा. तुम्ही ट्राइपॉडचा देखील वापर करू शकता. प्रकाशाकडे द्यावे विशेष लक्ष फोटो काढताना सर्वाधिक लक्ष प्रकाशाकडे द्यावे. कारण, प्रकाश जास्त असेल तर फोटोमध्ये केवळ प्रकाशच दिसेल व प्रकाश कमी असल्यास अंधारातील फोटो चांगले येणार नाही. त्यामुळे या दोन्हींचा समतोल साधणे गरजेचे आहे. ग्रिड लाइनचा करा उपयोग ग्रिड लाइनद्वारे तुम्ही सहज आपल्या ऑब्जेक्टवर फोकस करू शकता. अॅक्टिव्हेट करण्यासाठी कॅमेरा सेटिंग्समध्ये जा. येथे ग्रिड लाइन पर्याय मिळेल. या फीचरच्या मदतीने तुम्ही चांगले फोटो काढू शकता. बर्स्ट मोड फीचर अनेक यूजर्सला मूव्हिंग फोटो काढायला आवडतात. मात्र, काही चुकांमुळे हे फोटो चांगले येत नाहीत. अशात यूजर्स फोनमध्ये बर्स्ट मोडचा उपयोग करू शकतात. या फीचरद्वारे मूव्हिंग फोटो सहज काढू शकता. फ्लॅश लाइटचा वापर अनेकजण उपयोग नसतानाही फ्लॅश लाइटचा वापर करतात. मात्र, यामुळे फोटो खराब येतो. गरज असल्यावरच फ्लॅश लाइटचा वापर करावा. यामुळे फोटो चांगला येईल. जास्त प्रकाश असल्यावर फ्लॅश लाइटचा वापर करू नये. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2W9Dvzh