Full Width(True/False)

Xiaomi १५ ऑगस्ट सेल: Mi 11 Lite सह 'या' स्मार्टफोन्सवर धमाकेदार ऑफर्स, होणार हजारोंची बचत

नवी दिल्ली: Xiaomiतर्फे Independance Day निमित्त Mi आणि Redmi च्या ब्रँडेड स्मार्टफोनवर बंपर डिस्काउंट देण्यात येत आहे. Xiaomi सेल आता कंपनीच्या अधिकृत वेबसाइट Mi.com वर लाईव्ह आहे असून ९ ऑगस्ट २०२१ पर्यंत सुरु राहणार आहे. सेलमध्ये स्मार्ट टीव्ही, आणि लाइफस्टाइल गॅझेटसह इतर अनेक प्रोडक्ट्स सवलतीसह उपलब्ध असतील. वाचा: या सेलचे आकर्षण म्हणजे अलीकडेच लाँच करण्यात आलेले आणि हे दोन्ही स्मार्टफोन्स आकर्षक सवलतींसह उपलब्ध आहेत. Mi 11 Lite ने देशात आधीच चांगली कामगिरी केली आहे आणि Xiaomi स्वातंत्र्यदिनाच्या विक्री दरम्यान २०,४९९ रुपयांमध्ये खरेदी करता येईल. ही किंमत फोनच्या बेस व्हेरिएंटसाठी लागू आहे. जी ,आधी २१,९९९ होती. विशेष म्हणजे,काही दिवसांपूर्वी अशी बातमी आली होती की, Xiaomi भारतात Mi 11 Lite 4G बंद करू शकते. जी, नंतर कंपनीने नाकारली. दरम्यान, Mi 11X २५,९९९ रुपयांमध्ये उपलब्ध असून ही किंमत वनप्लस नॉर्ड 2 आणि पोको एफ 3 जीटी सारख्या नुकत्याच लाँच झालेल्या मिड-प्रीमियम स्मार्टफोनच्या किंमतीपेक्षा कमी आहे. तुलना करण्यामागचे कारण म्हणजे Xiaomi स्मार्टफोन उत्तम क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८७० SoC सह येतो. स्मार्टफोनमध्ये १२० Hz AMOLED डिस्प्ले आणि ३६० Hz टच सॅम्पलिंग रेट देखील आहे. सेल दरम्यान इतर स्मार्टफोनमध्ये Mi 10i (किंमत २०,४९९ रुपयांपासून सुरू होते), Mi 10T (किंमत ३०,४९९ रुपये) आणि Redmi 9 (किंमत ८,७९९ रुपयांपासून सुरू होते) समाविष्ट आहे. या स्मार्ट टीव्हीवर सवलत स्मार्ट टीव्हीमध्ये, Mi TV 4X (४३-इंच) २८,९९९ रुपयांच्या परवडणाऱ्या किंमतीत उपलब्ध आहे, तर या वर्षी Redmi Smart TV X50 (५०-inch) ३६,९९९ रुपयांमध्ये विकला जात आहे. शाओमीच्या sale दरम्यान शाओमीचा ५५ इंचाचा QLED स्मार्ट टीव्ही ५८,९९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे. Redmi Earbuds 2C (९९९ रुपयांमध्ये ) , Mi Smart Band 5 Black (Rs २,२९९ ) मध्ये मिळेल. डिस्काउंट व्यतिरिक्त, ग्राहक एचडीएफसी बँक क्रेडिट कार्ड वापरून सर्व Mi स्मार्टफोनवर ३,००० रुपयांची सूट देखील घेऊ शकतात. त्याचप्रमाणे, ते समान बँक कार्ड वापरून सर्व स्मार्ट टीव्हीवर ७,५०० रुपयांची अतिरिक्त सूट घेऊ शकतात. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3ysqqQ3