नवी दिल्ली : ७ ऑगस्ट रोजी टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये नीरज चोप्राने सुर्वण कामिगिरी करत भारतासाठी पहिले सुवर्णपदक जिंकले आणि भारतीयांनी एकच जल्लोष केला. त्याच्या विजयामुळे भारताच्या खात्यात एकूण ७ पदकं आली. कौतुकाचे प्रतीक म्हणून, शाओमी या नामांकित कंपनीतर्फे टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये सात भारतीय पदक विजेत्यांपैकी प्रत्येकाला Xiaomi चा प्रमुख फोन, भेट स्वरूप देण्यात येणार आहे. शाओमी इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनु कुमार जैन यांनी सांगितले की, टोकन म्हणजे या खेळाडूंना "स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आणि १.३ अब्ज लोकांच्या डोळ्यात आनंदाश्रू आणण्यासाठी" धन्यवाद म्हणण्याचा हा एक प्रयत्न आहे. वाचा: पुरुष हॉकी संघातील प्रत्येक खेळाडूला नीरज चोप्रा, , रवी कुमार दहिया, लवलिना बोर्गोहेन, पीव्ही सिंधू आणि बजरंग पुनिया हे भारतीय खेळाडूंच्या यादीत आहेत ज्यांनी आतापर्यंत चालू असलेल्या ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी पदके जिंकली आहेत. शाओमी या खेळाडूंना प्रीमियम Mi 11 Ultra स्मार्टफोन भेट देईल. कांस्य पदक जिंकणाऱ्या पुरुष हॉकी संघातील प्रत्येक खेळाडूला धन्यवाद म्हणून Mi 11X स्मार्टफोन मिळेल अशी घोषणाही कंपनीने केली. टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये भारताची कामगिरी आतापर्यंतची सर्वोत्तम राहिली आहे. खेळाडूंनी आतापर्यंत सात पदके जिंकली आहेत, जी कोणत्याही ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी सर्वोत्तम आहे. भारत सरकारने या खेळाडूंच्या राज्य सरकारांना तसेच या विजेत्या खेळाडूंना पुरस्कारांची घोषणा देखील केली आहे. Mi 11 अल्ट्रा विशेष का आहे? Mi 11 Ultra बद्दल बोलायचे तर, Xiaomi चा हा फोन प्रमुख स्नॅपड्रॅगन ८८८ प्रोसेसरने सुसज्ज आहे. Mi 11 Ultra ५० MP १/१.१२-इंच प्राथमिक कॅमेरा सेन्सरसह ट्रिपल-कॅमेरा सेटअपसह येते. हा फोन ४८MP अल्ट्रावाइड आणि ४८ MP टेलिफोटो कॅमेरा १२० x झूमसह पॅक करतो. यात दोन डिस्प्ले आहेत. समोर ६.६७ इंच सुपर AMOLED डिस्प्ले १२० Hz ला सपोर्ट करतो आणि १७०० nits पीक ब्राइटनेस आहे. मागील बाजूस, सूचना आणि इतर फंक्शन्ससाठी १.१ इंच डिस्प्ले आहे. ६७ W फास्ट चार्जिंग सपोर्टसह फोनमध्ये ५००० mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3Aq0DZu