नवी दिल्लीः दिग्गज टेक्नोलॉजी कंपनी गुगल आपला Pixel 5a स्मार्टफोन घेवून येण्याची तयारी करीत आहे. हा कंपनीचा स्वस्त स्मार्टफोन असणार आहे. काही रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, फोनची लाँचिंग टाळण्यात आली आहे. परंतु, एका ताज्या रिपोर्टमध्ये हा दावा केला जात आहे की, स्मार्टफोन याच महिन्यात लाँच केला जाणार आहे. लाँचिंग डेट शिवाय, स्मार्टफोनची किंमत सुद्धा लीक झाली आहे. जाणून घ्या या फोनसंबंधी सर्वकाही. वाचाः लाँचिंग डेट आणि फीचर्स इंग्रजी टेक वेबसाइट FrontPageTech च्या रिपोर्टनुसार, गुगलचा नवीन Pixel 5a स्मार्टफोनला २६ ऑगस्ट रोजी लाँच करण्यात येणार आहे. तारखेचा खुलासा यासंबंधीची माहिती असणाऱ्या काही सूत्रांनी केला आहे. रिपोर्ट मध्ये म्हटले की, Pixel 5a स्मार्टफोन मध्ये स्नॅपड्रॅगन 765G प्रोसेसर, 6GB रॅम आणि 4650mAh ची बॅटरी दिली आहे. वाचाः अन्य फीचर्स मध्ये या फोन मध्ये ६.४ इंचाची स्क्रीन मिळू शकते. हा डिस्प्ले ९० हर्ट्ज रिफ्रेश रेट सोबत येतो. यात २०२० मध्ये आलेल्या Pixel 5 डिव्हाइस सारखे कॅमेरा आणि एक हेडफोन जॅक मिळण्याची शक्यता आहे. यात IP67 रेटिंग मिळू शकते. परंतु, यात वायरलेस चार्जिंग सपोर्ट करणार नाही. विशेष म्हणजे फेब्रुवारीत लीक झालेल्या रिपोर्ट मध्ये सुद्धा असेच फीचर्स सांगितले होते. वाचाः किंमत किती असेल जे लोक Pixel 5a ला भारतात लाँच होण्याची वाट पाहत आहेत ते थोडे नाराज होऊ शकतात. कारण, गुगलने आधीच स्पष्ट केले आहे की, फोन केवळ यूएस आणि जपान मध्ये लाँच केला जाणार आहे. या फोनची किंमत ४५० डॉलर म्हणजेच जवळपास ३३ हजार ३९० रुपये आहे. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3AjMFrK