Full Width(True/False)

BBM 3 - खासगी आयुष्यामुळे चर्चेत राहिली स्नेहा, पहिला नवराही घरात

मुंबई : हिंदी आणि मराठी मालिकेतला प्रसिद्ध अभिनेत्री ओळखली जाते. स्नेहाने अधुरी एक कहाणी, काटा रुते कोणाला या मराठी मालिकांमध्ये काम केले आहे. त्यानंतर स्नेहाने ज्योती मालिकेतून हिंदी मनोरंजन विश्वात पाऊल ठेवले. स्नेहाने एक वीर की अरदास.. वीरा, शेर ए पंजाब– महाराजा रणजीत सिंह, चंद्रशेख, बिट्टी बिजनेस वाली, मेरे साई, चंद्रगुप्त मौर्या, कहत हनुमान जय श्री राम यांसारख्या अनेक मालिकांत काम केले. मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये काम करणारी ही अभिनेत्री कल्याणची आहे. कल्याणमधील शाळेत स्नेहाचे शिक्षण झाले. त्यानंतर तिने बिर्ला महाविद्यालयातून विज्ञान शाखेची पदवी घेतली. पदवी मिळाल्यानंतर फिल्ममेकींग कोर्ससाठी ती लंडनला गेली होती. स्नेहाला लहान असल्यापासूनच अभिनयाची आवड होती. तिने १३ व्या वर्षी मराठी नाटकांमध्ये काम करायला सुरुवात केली होती. त्यानंतर तिने 'अधुरी एक कहाणी' या मालिकेत श्वेता ही भूमिका साकारली होती. त्यानंतर मराठी मालिका 'काटा रुते कुणाला' या मालिकेतही मुख्य भूमिका साकारली होती. या दोन मालिकांमुळे स्नेहा घराघरात लोकप्रिय झाली आहे. त्यानंतर स्नेहाने 'ज्योती' हिंदी मालिका विश्वात पदार्पण केले. त्यामध्येही तिने महत्त्वाची भूमिका साकारली होती. थोड्याच काळात स्नेहाने मराठी आणि हिंदी मालिका विश्वात स्वतःचे स्थान निर्माण केले. याच काळात स्नेहाच्या आयुष्यातही अनेक घडामोडी घडत होत्या. तिने दोनवेळा लग्न केले परंतु तिची दोन्ही लग्ने अयशस्वी ठरली. स्नेहाचे पहिले लग्न याच्याशी झाले. परंतु हे लग्न फार काळ टिकले नाही. अविष्कार हा ज्येष्ठ नाट्यकर्मी पुरुषोत्तम दारव्हेकर यांचा मुलगा आहे. अविष्कारशी लग्न मोडल्यानंतर स्नेहाने सोळंकी यांच्याशी लग्न केले. परंतु हे लग्न देखील फार काळ टिकले नाही. स्नेहाची ही दोन्ही लग्ने अयशस्वी ठरल्याने तिच्या व्यक्तिगत आयुष्यावर जास्त चर्चा झाली.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3krznEL