Full Width(True/False)

विशाल शाकाहारी असूनही तृप्ती देसाईंनी डोक्यावर फोडली अंडी

मुंबई- '' सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. घरातील १५ सदस्य घरातलं आपलं स्थान टिकवून ठेवण्यासाठी कसे धडपड करतायत हे पाहण्यासाठी प्रेक्षकही उत्सुक आहेत. सध्या बिग बॉसकडून निरनिराळे टास्क देण्यात येत आहेत. त्यातून घरात जणू दोन गट तयार झाले आहेत. सध्या घरात हल्ला बोल हा टास्क खेळण्यात येत आहेत. या टास्कमध्ये घरातील सदस्य दोन गटात विभागले गेले. परंतु, हा टास्क करताना यांनी विशालच्या डोक्यावर अंडी फोडली आहेत. विशाल शाकाहारी असतानादेखील तृप्ती यांनी त्याच्या डोक्यावर अंडी फोडल्याने विशालचे चाहते नाराज झाले आहेत. हल्ला बोल या टास्कमध्ये मोटार सायकलवर बसलेल्या एका गटातील सदस्यांना दुसऱ्या गटातील सदस्यांनी युक्ती लढवून उठवायचे आहे. तर मोटार सायकलवर बसलेल्या सदस्यांनी काहीही झालं तरी जास्तीत जास्त वेळ त्यावर बसून राहायचे आहे. खेळाच्या सुरुवातीला सुरेखा कुडची आणि सोनाली पाटील या मोटार सायकलवर बसतात. परंतु, विरोधी गटातील सदस्य त्यांना मोटार सायकलवरून उठवण्यात यशस्वी होतात. त्यानंतर विशाल आणि विकास मोटार सायकलवर बसतात. त्यांना उठवण्यासाठी निरनिराळ्या क्लुप्त्यांचा वापर करून झाल्यावर तृप्ती विशालच्या डोक्यावर अंडी फोडतात. विशाल शाकाहारी आहे हे तृप्ती यांना माहीत असूनही त्या विशालच्या डोक्यावर अंडी फोडतात. सुरुवातीला तृप्ती विशालला या संबंधी वारंवार सूचना देतात. तृप्ती म्हणतात, 'मला माहीत आहे विशाल तू शाकाहारी आहेस मला तुझ्या अंगावर अंडी फोडायची नाहीत. तू उठ.' परंतु, विशाल हार मानत नाही. विशाल मोटार सायकलवरून उठायला तयार होत नसल्याने अखेर तृप्ती त्याच्या डोक्यावर अंडी फोडतात. त्यामुळे विशालचे चाहते तृप्ती यांच्या वागण्यावर काहीसे नाराज झाले आहेत.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3oi7T6Q