Full Width(True/False)

२०० कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी जॅकलिन होणार 'माफीची साक्षीदार'

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसची सोमवारी ईडीने २०० कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणी चौकशी केली. ही चौकशी सुकेश चंद्रशेखरने केलेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणी करण्यात आली. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार २०० कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी जॅकलिनला काही माहिती आहे का याचा तपास अधिकाऱ्यांनी यावेळी केला. या चौकशीवेळी तिला या रॅकेटमध्ये अडकवण्यात आल्याची माहिती जॅकलिनने दिली. त्यामुळे जॅकलिनची चौकशी साक्षीदार म्हणून करण्यात आली आहे. ने केलेल्या तपासामध्ये पुढे आले की, सुकेशने बॉलिवूडमधील एका प्रसिद्ध अभिनेत्यालाही लक्ष्य केले होते. या अभिनेत्याचे नाव गुप्त ठेवण्यात आले आहे. तपास संस्थेने २४ ऑगस्ट रोजी चैन्नईमधील सुकेशच्या बंगल्यावर छापा घातला. त्यातून त्यांना ८२ लाख रुपये मिळाले होते. याशिवाय १२ पेक्षा अधिक आलिशान गाड्या जप्त केल्या होत्या. दरम्यान, सोमवारी जॅकलिनची ईडीने सुमारे ५ तास चौकशी केली. या चौकशीवेळी जॅकलिनने काही महत्त्वाची माहिती अधिकाऱ्यांना दिली. तिने दिलेल्या माहितीनुसार तिच्यासह आणखी एक अभिनेत्याला सुकेशन लक्ष्य केले होते. याप्रकरणी जॅकलिनचा जबाब नोंदवण्यात आला आहे. सुकेश आणि लिनाच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी सुकेशनं एका बड्या उद्योगपतीची पत्नीकडून दोनशे कोटींची वसुली केली होती. यावेळी लीना पॉलचीही चौकशीही करण्यात आली होती. दरम्यान, ईडीने गेल्या आठवड्यात दिलेल्या माहितीनुसार या आर्थिक घोटाळ्याचा सुकेश हा मास्टर माईंड आहे. त्याच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सध्या तो तिहार कारागृहात आहे. चंद्रशेखरला २०१७ मध्ये निवडणूक आयोगाने एका लाचखोरीप्रकरणामध्ये अटक केली होती. त्याच्यावर आरोप होता की त्याने निवडणूक चिन्हाप्रकरणी एआयएडीएमकेच्या नेत्या टीटीवी दिनाकरण यांच्याकडून पैसे घेतले होते. हे पैसे तो निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना लाच म्हणून देणार होता.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3BuujVL